सर्वात वर

SENSEX ४९ हजारांवर : शेअरबाजारात खरेदीचा सपाटा

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

(Stock Market Today) भारतीय शेअर बाजार रोज ह्या ना त्या कारणाने आणि विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये असलेल्या मागणी मुळे  नवीन नवीन उच्चांक गाठत आहे. ग्लोबल मार्केट,  FII INVESTMENT , आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणेनुसार हा अर्थसंकल्प काही वेगळाच असेल असे जाणकारांचे मत आहे ,आता ही अर्थसंकपाची पेटी जेव्हा उघडेल तेव्हा उघडेल परंतु भारतीय शेअर बाजारात INDEX थांबण्याचे नाव काही घेत नाही आहे एवढे मात्र नक्की.

नवीन वर्षाचा आजचा 11 दिवस होता की, बाजारात (Stock Market Today) नवीन उच्चांक ( INTRADAY) मध्ये तरी करून परत आपल्या पातळीवर स्थिरावला आहे, त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 486 अंकांनी वधारून 49 हजाराच्या पार म्हणजे 49269 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 138 अंकांनी वधारून 14485 ह्या पातळीवर बंद झाला तर बारा BANKING समभागांचा निर्देशांक NIFTY BANK मात्र नफा वसुली मुळे 85 अंकांनी घसरून 31999 ह्या पातळीवर बंद झाला तर आज एक नवीन INDEX भारतीय शेअर बाजारात सुरू झाला त्याचे नाव आहे.

BANKING AND FINANCIAL SERVICES .

तसे बघितले तर भारतीय शेअर बाजार (Stock Market Today) जरी ग्लोबल संकेतांच्या आधारावर दिशा दर्शवत असला तरी जगातील विदेशी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविधता क्षेत्रात गुंतवणूक होत आहे.

बाजार जरी पन्नास हजाराच्या दिशेने कूच करत असाला तरी नवीन अथवा जुन्या गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, बाजार सर्वात उंचीवर आहे त्यामुळे गुंतवणूक करतांना लागल्या प्रतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक तर करावीच पण बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबवावे.

NIFTY १४४८५ + १३८

SENSEX  ४९२६९ + ४८६

BANK NIFTY ३१९९९ – ८५%


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  TATA MOTOR २२३ + १३%

HCLTECH १०५३ + ६%

INFY १३७६ + ५%

WIPRO ४४७ + ४%

HDFC २७४७ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATA STEEL ६९५ – ३%

ADANIPORTS ५०७ – २%

BAJFINANCE ४९८३ – २%

BAJAJFINSV ९००४ – २%

RELIANCE १८९९ – २%

यु एस डी आय एन आर $ ७३.५४५०

सोने १० ग्रॅम      ४९२४०.००

चांदी १ किलो       ६४८६०.००

क्रूड ऑईल           ३८१५.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक 

Mobile – 8888280555