सर्वात वर

शेअर बाजार ५२० अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदाडे,नाशिक 

बाजार सध्या भारतीय शेअर (Stock Market Today)बाजारातील चढ उतार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचाली नुसार होत आहेत .काल आर्थिक वर्षाचा शेवटच्या  दिवसाची सुरुवात बाजारात जोरदार पडझळीने झाली होती परंतु आज सकाळी जागतिक स्तरावरील संकेतांच्या आधारे  भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक उघडले त्यानंतर बाजार विक्रीचा जोर दिसला पण परत बाजारात खरेदी बघायला मिळाली त्याचाच परीणाम म्हणून बाजार बंद झाला. 


मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 520 अंकांनी वधारून 50029 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक 176 अंकांनी वधारून 14867 ह्या पातळीवर स्थिरावला तर NIFTY BANK सुद्धा 554 अंकांनी वधारून 33858 ह्या पातळीवर बंद झाला. 

आजच्या बाजारात ((Stock Market Today)) खालच्या स्तरावरून METAL आणि BANKING क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसली .
बाजारात सध्या सुट्टीसारखा वातावरण आहे कारण सोमवारी सुट्टी होती त्याच बरोबर शुक्रवारी सुद्धा सुट्टी आहे .बाजारातील जाणकार सांगत आहेत की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती , महागाई, आणि महाराष्ट्रात वाढते करोनाचे रुग्ण ह्या मुळे बाजारात संभ्रमित वातावरण आहे त्याच बरोबर FII आणि DII सुद्धा मार्च ENDING ला निर्णय हातात ठेवत असतात ,बाजारात चढ उतार तर दिसतील पण STOCKS SPECIFIC ACTION सुद्धा बघायला मिळतील, त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबवावे. 

कमोडीटी मार्केट मध्ये सोने आणि चांदी मध्ये वत ,घट दिसत आहे परंतु मागच्यावर्षी करोनाच्या परिस्थितीत एक सुरक्षित गुंतवणूक म्हणुन गुंतवणूकदारांनी सोने चांदीला पसंती दिली होती त्यामुळे दर जगभरात उंच स्तरावर पोहचले होते, सध्या मात्र सोने आणि चांदी ची चमक फिकी दिसत आहे त्यामुळे बाजारातील जाणकार सांगत आहेत की, बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबून खरेदीला सुरवात करायला हवे. 

(Stock Market Today)

NIFTY १४८६७ + १७६
SENSEX ५००२९ + ५२०
BANK NIFTY ३३८५८ + ५५४

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स

JSW STEEL ५०५ + ८%
HINDALCO ३४८ + ७%
TATA STEEL ८५९ + ६%
ADANIPORTS ७३३ + ५%
INDUSINDBK ९९६ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HINDUNILVR २३९९ – १%
NESTLEND १७०५१ – १%
HDFC LIFE ६९२ – १%
DIVISLAB ३६१० – १%
TCS ३१६७ – १%

यु एस डी आय एन आर $ ७३.४४५०

सोने १० ग्रॅम         ४४९४०.००

चांदी १ किलो       ६४१८०.००

क्रूड ऑईल            ४३७१.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदाडे,नाशिक