
नाशिक मध्ये अंशतः लॉक डाऊन : शनिवार आणि रविवार सर्व दुकाने बंद राहणार

…तूर्त हॉटेल व बार शनिवार आणि रविवारी सुरु राहणार
नाशिक – नाशिक मध्ये सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.कालच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिक मधील अनेक लोकांशी तसेच प्रशासनातील महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत हे निर्बंध उद्या दि १० मार्च पासून संपूर्ण जिल्हयात लागू होणार आहे.
काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधा विषय नियमावली जाहीर केली असून नाशिक जिल्ह्यात शनिवार आणि रविवार अंशतः लॉक डाऊन होणार असून सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.या बंद मधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत चारपटीने वाढ झाली. त्यामुळे कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शनिवार आणि रविवार पूर्ण बाजारपेठा बंद राहणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस नागरिकांना पुन्हा एकदा लॉकडाऊनचा अनुभव येणार आहे.
तूर्त हॉटेल व बार शनिवार आणि रविवारी सुरु राहणार
हॉटेल व बार वर आठवडाभरासाठी वेळेचे बंधन आणि उपस्थितीचे सुद्धा 50% चे बंधन आधीच घालण्यात आलेले आहे. त्यामुळे वेगळ्याने शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस बंद ठेवण्याची आवश्यकता तूर्त वाटत नाही. हॉटेलमध्ये व बारमध्ये जाण्याच्या वेळा सर्वसाधारणपणे संध्याकाळच्या असतात आणि त्यावर 50% ची मर्यादा पूर्ण आठवड्यासाठी कायम करण्यात आलेली आहे. यासंदर्भात जर तेथेही सायंकाळी खूप गर्दी होत असल्याची बाब निदर्शनास आली तर त्याबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल.
काल काढलेले आदेश हे अंतिम आदेश नसून एकूण निर्बंधांचा हा पहिला टप्पा आहे.. जसजसा अनुभव येईल तसे हे आदेश सुधारित केले जातील.
– सूरज मांढरे
जिल्हाधिकारी नाशिक
नाशिक जिल्हा व शहरातील विविध निर्बंध आन संदर्भातील आदेश काल रात्रीच पाठवण्यात आलेले आहेत. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सर्व दुकाने (जीवनावश्यक सोडून) व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील अशी स्पष्ट तरतूद त्या आदेशामध्येच आहे
शनिवारी व रविवारी सुट्टीचा फायदा घेऊन होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हे निर्देश दिलेले आहेत.
-सूरज मांढरे
जिल्हाधिकारी नाशिक

