सर्वात वर

सुबोध भावे आणि ऋतुजा बागवेची नवी मालिका “चंद्र आहे साक्षीला”

बातमीच्या वर

मुंबई-चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’  हि नवी मालिका ११ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीसाठी येत आहे.या मालिकेत श्रीधरची भूमिका सुबोध भावे साकारणार असून स्वातीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे दिसणार आहे.बर्‍याच काळानंतर सुबोध भावे पुन्हाएकदा छोट्या पडद्यावर येत आहे याचा आनंद सर्वच रसिक प्रेक्षकांना आहे.सुबोधला प्रेक्षकांनी बऱ्याच भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. 

स्वाती आणि श्रीधर यांच्यातील हळुवार प्रेमकहाणीला रहस्याची किनार आहे.काय असेल हे रहस्य ज्यामुळे स्वातीचे आणि त्याचसोबत श्रीधरचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. कथेतील स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ.‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’ असे तिचे म्हणणे आहे” आणि याचमुळे स्वभवाने चांगली असून देखील वयाच्या चौतीसाव्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे.अशाच स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं.दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो. आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. या दोघांचे आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पुर्णपणे बदलून जाणार ? स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात नक्की काय घडणार ? याची उत्कंठावर्धक कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली