सर्वात वर

मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे भरीव पक्षनिधी

नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस अंकुश पवार आणि कार्यकारणी सदस्य संदेश जगताप पदाधिकाऱ्यांनी अमित राज ठाकरे यांची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे रक्कम रुपये पाच लाख एकतीस हजारांच्या रक्कमेचा धनादेश पक्षनिधी म्हणून त्यांच्या सुपूर्द केला.

जागतिक कोरोना महामारी काळात राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे अनेक आस्थापनांतील कामगारांच्या रोजगारीचे, थकीत पगाराचे आदि प्रश्न सोडवतांना सोबत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने भरीव पक्षनिधी देत आपली सामाजिक बांधिलकी जपली. या वेळी अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड काळात केलेल्या विविध जनहितकारी कामांची माहिती घेतली व औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वाटचालीची प्रशंसा केली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद राजू (दादा) पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे उपस्थित होते.