सर्वात वर

“सुरक्षित कुटुंब”लघुपट कोरोना काळात मार्गदर्शक ठरेल-जिल्हाधिकारी सुरज मांढरे

बातमीच्या वर

नाशिक:जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी, बेफिकीर राहून चालणार नाही. स्वयंशिस्त पाळणं हे कोरोनाशी मुकाबला करण्याचे उत्तम साधन असून या आजाराबाबत “सुरक्षित कुटुंब” हा लघुपट मार्गदर्शक असून या लघुपटपटाव्दारे जनजागृती करून निश्चितपणे नाशिक कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे व्यक्त केला.

कोरोना विषाणू बाबत जनजागृती व्हावी ह्यासाठी शारदा क्रिएशन प्रस्तुत “सुरक्षित कुटुंब” हा लघुपट तयार करण्यात असून ह्या लघुपटाचं प्रकाशन  जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, दिग्दर्शक आणि निर्माते सुरेश चव्हाण अभिनेता कपिल भास्कर,सोनू जॉर्ज,कुमारी आलीय वझरे,लक्ष्मी पिंपळे,कडुंबा दंडगव्हाळ,सचिन बनतोडे,कुंदा शिंदे बच्छाव, किरण वझरे,धीरज वझरे आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, 2020 या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरासह भारतातही कोरोना विषाणू सावट पसरण्यास सुरुवात झाली.

आधुनिकतेकडे वाटचाल करणारे देशही कोरोनापुढे झुकले. संपुर्ण जगासाठीच ही महामारी नवीन असल्याने सुरूवातीच्या काळात अनेकांचे या आजाराने बळी गेले. परंतु शासन, आरोग्य यंत्रणा,महसूल यंत्रणा, पोलीस प्रशासन,महानगरपालिका आणि संबधित विभागांनी एकत्रित येत केलेल्या नियोजनामुळे आज या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अर्थातच यात नागरीकांनी दाखवलेला संयम आणि केलेले सहकार्य हेही तितकेच महत्वाचे आहे.

या आजारामुळे आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे अधोरखित झाले आणि एक आरोग्य चळवळ यामुळे सुरू झाली. राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात या आजाराचा संसर्ग वाढत असतांना नाशिक जिल्ह्यात मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले. नंतरच्या काळात जिल्ह्यात आजाराचा संसर्ग वाढत गेला. मालेगाव सारख्या भागात वाढत्या संसर्गामुळे शासनाचे लक्ष मालेगावकडे लागून होते मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, शासन स्तरावरून यंत्रणेला दिलेले पाठबळ यामुळे आज नाशिकमध्ये कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. परंतु असे असले तरी आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. त्यामुळे आता प्रत्येकाने स्वतः आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.. म्हणूनच माझं कुटुंब माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकाने सुरक्षेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. यादृष्टीने हा लघुपट निश्चितच नाशिककरांना मार्गदर्शक ठरेल असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले. 

नाशिकचे दिग्दर्शक सुरेश चव्हाण यांच्या लेखणीतून सुरक्षित कुटुंब या लघुपट साकारण्यात आला आहे. माणसांनी घरातला वावरतांना, घराबाहेर पडल्यानंतर,आणि कार्यालयीन कामकाजामध्ये काय सुरक्षितता बाळगावी हा संदेश देण्यात आला आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली