
खाजगी हॉस्पिटला नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांची सरप्राईझ व्हिजिट

पी.पी.किट परिधान करून मनपा आयुक्तांनी साधला रुग्णांशी संवाद
नाशिक – नाशिक शहरात खासगी हॉस्पिटल मध्ये नाशिक महानगरपालिकेचे बेड आरक्षित करावे असे आदेश आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner) यांनी काही दिवसापूर्वी काढले होते. याची अंमलबजावणी होते की नाही यासाठी मनपाचे बेड आरक्षित आहे कि नाही या बाबत पाहणी करण्याच्या दृष्टीने काल आयुक्तांनी अचानक दोन हॉस्पिटलची पाहणी केली.
नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत याबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन मनपाच्या वतीने खाजगी हॉस्पिटलला दिलेल्या आदेशान्वये त्या हॉस्पिटलमध्ये बेडचे आरक्षण केलेले आहे की नाही याबाबत जाणून घेण्यासाठी तसेच सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असणारे रुग्ण मध्यम स्वरूपाच्या आजाराचे, विना लक्षण अथवा कशा स्वरूपाचे आहेत याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः पाहणी केली.

तसेच एका हॉस्पिटल मध्ये राज्य कोरोना समन्वयक मा.सुधाकर शिंदे व मा.आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner) यांनी पी.पी.किट परिधान करून रुग्णांशी संवाद साधला. या पाहणीच्या वेळी अशोका हॉस्पिटल व व्होकार्ड हॉस्पिटल या दोन रुग्णालयाची पाहणी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केली त्यांच्या समवेत राज्य कोरोना समन्वयक मा.सुधाकर शिंदे,डॉ.विजय पावस्कर, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदी उपस्थित होते.
