सर्वात वर

IPL २०२१ च्या स्पर्धांना स्थगिती

मुंबई – IPL चा १४ वा हंगाम स्थगित निर्णय घेतला आहे अशी माहिती बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी दिली आहे.देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.  कालच आयपीमधील  कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना बायो बबलमध्ये असताना करोनाची लागण झाली होती.त्यामुळे  आयपीएलच्या (IPL) १४ व्या हंगामावर स्थगितीचे ढग तयार झाले होते.
खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कालची कोलकाता आणि बेंगळुरू ही लढत स्थगित केली होती. तर आज सकाळी उद्या होणारी चेन्नई आणि राजस्थान ही लढत स्थगित केली होती.

आयपीएलच्या बायो बबलमध्ये राहणाऱ्यांना करोना झाल्याने काळजी वाढली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज मंगळवारी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. स्पर्धा पुन्हा कधी होणार याचा आम्ही विचार करतोय. पण सध्या तरी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.असे म्हंटले आहे.