सर्वात वर

ताडगोळा : आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र -६ )

डॉ राहुल रमेश चौधरी 

आज आपण आहार मालिकेत ज्या फळाची माहीती घेणार आहोत ते खूप कमी जणांना माहीती असलेले आहे,जे फळ आपण नीरा व ताडी या पेयासाठी वापरतो ते म्हणजे ताडगोळा.ताडगोळा (ice-apple) किंवा पाम फ्रुट या नावाने ओळखले जाते.खजूर,नारळ,ताडगोळे (Tadgola) यांच्या झाडात नवीन माणसाची ओळखण्यात गल्लत होतेच.ताडगोळे झाडावरून उतरवणे कौशल्याचेच काम.हळुवार उकलल्यानंतर आतमध्ये पारदर्शी ,पांढराशुभ्र गर म्हणजे लोकांना पर्वणीच.कोवळ्या ताडगोळ्यात गोडसर पाणी असते.ताडगोळा हळूवार सोलून खाण्यातच मजा आहे.

नीरा कही काळ ठेवल्यानंतर आंबते त्यास ताडी म्हणतात.कोकण,ठाणे,अहमदाबाद,बिहार,इंडोनेशिया,थायलंड,फिलीपाईन्स या भागात जास्त येणारे कोवळे-जांभळे ताडगोळे लोकांना आकर्षित करतात. अश्या या अनोख्या फळाची आपण आज माहीती घेणार आहोत.

ताडगोळा(Tadgola) : आरोग्यास फायदे (Health Benefits of Tadgola)

१. ताडगोळे (ice-apple) कोवळे खाण्यासाठी वापरावेत.कोवळ्या ताडगोळ्यात पाणी देखील मिळते व त्याचा गर देखील आरोग्यदायी असतो.

२. अंगाची आग होत असल्यास ताजी ताडी व खडीसाखर हे मिश्रण घ्यावे याने लघवीच्या तक्रारी देखील दूर होतात.

३. ज्या पुरुषांमध्ये हस्तमैथुन,अतिप्रमाणात संभोग,स्वप्नदोष यामुळे होणाऱ्या शुक्रक्षयात याचा उत्तम उपयोग होतो.

४. ताडीने हलकीशी नशा येते,ताजी फ्रेश ताडी गोड लागते आणि शिळी ही आंबते.ताजी ताडी वापरावी,याने भूक व्यवस्थित लागते,खाल्लेले पचते,शक्ती वाढते.

५. उन्हात फिरणे,खूप तिखट,गरम यामुळे लघवीस आग होवून थोडे थोडे होणे ,वारंवार तहान लागणे अश्या तक्रारी असल्यास कोवळे ताडगोळे व खडीसाखर ,प्रवाळ घ्यावे.

६. पोटात आग होणे,डोळ्यांची आग होणे,हातपाय भाजल्यासारखे वाटणे यामध्ये ताडगोळ्यांनी निश्चित फायदा होतो.

७. डोळ्यांची आग होवून दुखत राहील्यस कोवळा ताडगोळा पाण्यात वाटून डोळ्यावर ठेवावा.

८. अशक्तपणा,शुक्रधातु किंवा वीर्य अतिशय पातळ असल्यास ताडगोळे खावे याने शुक्र धातु घट्ट होतो व उत्साह येतो.

९. आतड्यात कोरडेपणा आल्याने कडक शोचास होणे,मळाच्या गाठी होणे,जोर करावा लागणे यामध्ये ताडगोळे गर वाढत्या मात्रेत सल्ल्यानुरुप खावे.

१०. गळू पिकत नसल्यास जुना ताडगोळा वाटून हळद टाकून गरम करून पोटीस बांधावे.

११. अंग कोरडे पडणे,भूक न लागणे,त्वचा कोरडी पडणे,याकरीता साध्या गुळाच्या ठिकाणी ताडगुळ वापरावा.

सावधान…….!!!!!

१.जुना कडक ताडगोळा खाल्ल्यने जुलाब होतात व पोट दुखते

२.केळी व ताडगोळा एकत्र खावू नये

३.ह्र्द्यरोग व आमवात रुग्णांनी खावू नये

४.ताडगोळा खाल्ल्यावर गार पाणी,ताक,दही घेवू नये याने रक्त व पित्ताचे विकार होतात.

५.सर्दी खोकला-कफ वारंवार होणे-जुलाब वारंवार होणे अश्या रुग्णांनी ताडगोळा खावू नये.

६.आंबट ताडी पिवू नये याने रक्त विकार होतात.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ राहुल रमेश चौधरी 

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०