सर्वात वर

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडणार : मुख्यमंत्री 

बातमीच्या वर

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि  प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. परंतु मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करता येणार आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे आणि मंदिरे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा!आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असे  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला.वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल.असे हि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. 

दिवाळीच्या मुहूर्तावर भक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली