सर्वात वर
AC Ad

सोशल मीडियावर सुरु आहे स्टार प्रवाहाच्या कलाकारांची धूम

बातमीच्या वर

तमिळ सिनेमाच्या गाण्यावर धरला ठेका आणि स्वीकारलं नवं चॅलेंज

मुंबई – स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मालिकांमधील कलावंत सतत चर्चेत असतात.या सर्व कलावंतांनाही रसिकांकडून भरभरून प्रेम मिळत असते .आपल्या मालिकांतून हे कलावंत रसिकांच्या मनोरंजनाची जवाबदारी पार पाडत असतात.  पडद्यामागे देखिल कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकार मंडळी नियमित पुढे येऊन हे चॅलेंज स्वीकारतात.नुकतंच स्टार प्रवाहवरील (Star Pravah) या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.आणि हा विषय चर्चेचा ठरला

या भन्नाट डान्स मध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांनीही  सहभाग घेतला. पडद्यावर या दोघांचं फार जमत नसलं तरी पडद्यामागची या दोघांची केमिस्ट्री खरोखर वाखाणण्या जोगी होती. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर नियमित सक्रिय असतात. त्यांनी देखिल सरु, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात डान्स केला त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या टीमच्या उत्साहालाही तोड नाही. या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला. गिरीजा उत्त्तम नृत्यांगना आहे त्यामुळे या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली. गौरी प्रमाणेच मुलगी झाली हो मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर देखिल यात मागे नव्हती. व्हिडिओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला. या सर्व व्हिडिओंना स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर लाखांमध्ये व्हूज आहेत. इतर माध्यमांवर देखिल हे व्हिडिओज भरभरुन व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.

बातमीच्या मध्ये
Ac square