सर्वात वर

लोण्याचे आरोग्यास फायदे

डॉ.राहुल रमेश चौधरी

(आहार मालिका क्र – १२) 

आजकाल रुग्णांना लोणी (Butter) खातात का असा प्रश्न विचारला कि त्याचे चेहरे बघण्यासारखे होतात मात्र त्यानंतर ते खुललेल्या चेहऱ्याने सांगतात कि आम्ही रेडिमेड बटर खातो अर्थात ते salted प्रकारातले खातात जे की अजिबात हितकारक नसते.अमूल मध्ये unsalted,peanut,almond  असे देखील प्रकार येतात त्यापैकी unsalted खाणे त्यातल्या त्यात योग्य.काळानुरुप लोणी खूप कमी जण घरी काढतात.त्यामुळे हा प्रकार बरा.घरीच लोणी काढलेले योग्य.शेवटी तुमची भूक कशी आहे त्यावर सगळा प्रकार अवलंबून असतो.

ताक बनवताना जो स्निग्ध भाग वेगळा निघतो त्यास लोणी (Butter) म्हणतात.लोणी दोन प्रकारांनी काढले जाते.एक म्हणजे दूधापासून आणि दुसरे म्हणजे ताकापासून.दोघांचे गुणधर्म वेगवेगळे असतात.त्यांचे औषधी गुणधर्म देखिल त्यामुळे बदलतात. 

प्रत्यक्ष दूध घुसळून जो स्निग्ध भाग मिळतो.तो अतिशय थंड,स्निग्ध,पित्तस शांत करणारा,रस-रक्त-शुक्र-मज्जा या शरीरातील ७ धातुंपैकी ४ धातु वाढवणारा असतो.हे लोणी डोळ्यांना हितकारक,बळ वाढवणारे,मळाला बांधणारा असतो.तर ताकापासून काढलेले लोणी थंड,शुक्र वाढवणारे,चेहऱ्याचा वर्ण बदलणारे,मन प्रसन्न करणारे,भूक आणि पचन वाढवणारे,बुध्दिला हितकारक गोड असते.
अश्या या लोण्याचे (Butter)आपण फायदे पाहूयात व निषिध्द कोणात असते ते देखिल बघूयात.

लोण्याचे (Butter)फायदे

.तोंडाचा पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना औषधांसोबत ताकापासून काढलेले लोणी चेहऱ्यास चोळून लावावे तसेच त्त्याचे नस्य म्हणजे ते नाकात टाकावे.लोणी व खडीसाखर याची गोळी तोंडात धरून चघळावी.याने चांगला फायदा होतो.

.लहान व मोठ्या आतड्याची शक्ती कमी झाल्याने अन्न घटकांचे शोषण व्यवस्थित होत नाही त्यामुळे ग्रहणी नावाचा आजार बऱ्याच जणांना होतो ज्यात रुग्णाला सारखे सारखे शौचास जावे लागते.अश्या वेळेला अन्नासह लोणी खाल्ल्यास आतड्यांना बळ मिळते व अन्नग्रहण शक्ती वाढते.

.खूप लोकांना वाटते लोणी,तूप खाल्ल्याने जाड होणे,वजन वाढणे,कोलेस्टेरॉल वाढणे,हार्ट ऍटक ची भीती असते असे आजार होतात पण पचनशक्ती भक्कम असेल तर कसलाही त्रास होत नाही.  वरील सर्व गैरसमज जे भरवले आहेत ते सर्व चुकीचे आहेत.salted butter बाबत कोणीही बोलत त्याबाबत मात्र ते सर्वत्र चालते.असो..ताजे लोणी पूर्णपणे खाणे वापरणे योग्य.

.नियमीतपणे ताजे लोणी खाल्ल्यास अन्नविषबाधा त्रास संभवत नाही आणि झालाच तर लवकर बरा होतो असा अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या वैद्यांचा अनुभव सांगतो.व तो प्रत्यक्षात दिसतो देखील.

.गर्भिणी स्त्रीने गर्भारपणाच्या काळात रोज लोण्याचा वापर करावा.याने मातेला परीणामी गर्भाला चांगला फायदा होतो.गर्भाचे उत्तम पोषण होते.त्वचा वर्ण उजळतो.गर्भाचे अवयव योग्य रीतीने तयार होतात याशिवाय बुध्दी,सर्व इंद्रिय,लक्षात ठेवण्याची क्षमता देखील अगदी व्यवस्थित होते.

.खोकला वाढत जाणे,कोरडा खोकला असणे,वजन कमी होत जाणे अश्या क्षयाच्या लक्षणात ताजे लोणी औषधांसह वापरावे.

.मुळव्याध व परिकर्तिका म्हणजेच शौचाच्या जागी आतून चिरा पडून रक्त पडते अश्या अवस्थेत लोणी नागकेशरासह द्यावे याने आग कमी होते आणि रक्त पडणे कमी होते याशिवाय शौचाला कडक होत नाही यासोबत औषधोपचार विसरू नये.व पथ्यपालन करावे

.आज काल बरेच जण पार्लर चा वापर करणे,कृत्रिम सौंदर्य प्रसाधने करणे,केमिकल पिल,कृत्रिम सौंदर्य प्रसाधनांनी फेशियल करणे यामुळे नाजूक त्वचा रापते,उष्णता वाढते व त्वचेचा वर्ण बिघडतो याकरीता रोज लोणी लावल्यास व ताजे लोणी पोटातून घेतल्यास खूप चांगला फरक दिसून येतो.

.उष्णतेचा त्रास असलेल्यांनी लोणी रोज जेवणात ठेवावे.

१०.शुक्रधातुक्षीणतेने अनेक तक्रारी निर्माण होतात,यात नैराश्य,मांडी,कंबर,पोटऱ्या दुखणे,उदासीन वाटणे,थोडे कामाने थकवा जाणवणे,संताप-चिडचिड होणे याकरीता दूध,लोणी.खडीसाखर घ्यावे याने तात्काल फरक दिसून येतो.

११.अनेक लहान मुलांचे पालक वजन वाढीच्या तक्रारी घेवून येतात यामध्ये लोणी,मध यासह औषधे दिल्यास वजन भरते.भूक लागते,जेवणात आवड निर्माण होते.

१२.अनेकांना पातळ भसरट शौचास होते वारंवार होते त्यांनी लोणी दोन्ही वेळा जेवणात ठेवावे.

१३.डोळ्यांची आग होणे,वाचतान डोळे दुखणे,डोळे कोरडे पडणे,अश्या वेळेला लोण्याचा पोटातून घेण्याव्यतिरिक्त डोळ्यावर लेप करावा.त्याचे थेंब नाकात टाकावे.

१४.बऱ्याच लोकांना उन्हात फिरल्यावर हाताची पायची तळव्यांची जळजळ होते,लघवीस आग होते,पोटात गरम वाटते,भरपूर घाम येतो,उष्णतेचे विकार जाणवतात अश्या करीता नियमीत लोणी खावे.

१५.वारंवार नाकातून रक्त येत असल्यास नाकात लोण्याचे थेंब टाकावे.लोणी खडीसाखर खावे व चेहऱ्याला चोळावे याने निश्चित फायदा होतोनिषेध

.कफाचा त्रास,कावीळ असलेल्या रोग्यांनी लोण्याचे सेवन टाळावे

.लोणी शिळे टाळावे

.ज्यांच्या शरीरात अतिप्रमाणात मेद आहे त्यांनी लोणी टाळावे.

.रोज लोणी १ चमच्या पेक्षा जास्त खावू नये.

वैधानीक इशारा

आयुर्वेद (Ayurveda) डॉक्टरांच्या सल्ल्याने लोण्यासोबत (Butter)औषधांचा वापर करावा.आपली प्रकृती,भूक तपासून लोण्याचा वापर करावा

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०