सर्वात वर

सुहास भोसले दिग्दर्शित “कोती” चित्रपट ८ नोहेंबरला होणार प्रदर्शित

बातमीच्या वर

 अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधे कोती चा सन्मान 
नाशिक
(प्रतिनिधी)- अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  महोत्सवांमधे गौरवलेला ओएम आर्ट निर्मित “कोती ” हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.एक महत्वाचा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला असल्याने अनेक रसिक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

कोती चित्रपटाचा विषय हा तृतीयपंथीयांच्या बालपणीचा गोष्ट असलेला आहे. आपल्या भावाला समाज का झिडकारतो या विचारातून त्या विरोधात दुसऱ्या भावाने लढा या आशयसूत्रावर ‘कोती’ बेतला आहे. दोन भावंडातील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांच्या विषय हाताळलेला नाही. या पार्श्वभूमीवर “कोती ” महत्वाचा चित्रपट ठरणार आहे. अशी भावना चित्रपटाचे दिग्दर्शक सुहास भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

 इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (iffy) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. भारत सरकारने कान्स महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती हि मराठी चित्रपटासाठी गौरवाची गोष्ट आहे. या शिवाय दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार,संस्कृती कलादर्पण पुरस्कारमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार,तसेच कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.

 आज्ञेश मुडशिंगकर ,दिवेश मेदगे ,संजय कुलकर्णी ,विनिता काळे,मोहिनीराज गटणे यांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ओएम आर्टचे डॉ संतोष पोटे,डॉ सुनीता पोटे यांनी निर्मित केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहास भोसले यांनी केले आहे. या आधी वाळू माफियांवर आधारित रेती या चित्रपटातून सुहास भोसले यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

 कोती चित्रपटासाठी भरत आर पार्थसारथी यांनी छायांकन सागर वंजारी यांनी संकलन संजय नावगिरे यांनी गीते तर बबन अडागळे व मनोज नेगी यांचे संगीत लाभले आहे. 

‘कोती ‘ हा हृदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटाने अनेक मानसन्मान मिळवून दिले .अतिशय महत्वाचा विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. अनेक महोत्सवात  या चित्रपटाला गौरविल्यानंतर रसिक प्रेक्षक या चित्रपटास भरभरून प्रतिसाद देतील महत्वाच्या विषयासह नाते संबंध ,सामाजिक दृष्टिकोन अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा चित्रपटाच्या निर्मात्या डॉ सुनीता पोटे यांनी नाशिक  आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली