सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

बातमीच्या वर

हरिअनंत,नाशिक  

दांमपत्य सुख या ठिकाणी म्हणजे पंचमस्थानी सिंह राशी लग्न कुंडलीत शनी शुभ संबंधित असून स्वगृही किंवा उच्च असेल,तर स्त्रीसुख बऱ्यापैकी चांगले मिळते.६,१०,२राशीचा शनी असता म्हणजे कन्या,कुंभ वा वृषभ राशीचा शनी असता स्त्रीच्या पोटात दुखणे, गर्भाशयाचा आजार असतो. या आजारामुळे दुसरा विवाह करावयाचा प्रसंग येतो, कधी कधी अर्थात  एखाद्या वेळेस तिसराही विवाह होतो. या ठिकाणी शनी असता एखाद्या स्त्रीवर प्रेम बसले असेल,तर प्रेमाचे रूपांतर विवाहात होत नाही.  यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हा विवाह होत नाही. हा शनी  अशुभ असून हर्षल अगर रवि, चंद्राच्या अशुभ दृष्टीचा असेल, तर परस्त्रीवर प्रेम करील मात्र ती परस्त्री वयाने आठ ते दहा वर्षे अधिक असेल.  तिच्याशी विवाह होईल, पण दुर्दशा, आपत्ती  विविध अडचणीची शृंखला  आयुष्यभर राहील.  

हे स्थान प्रेम,अगर  प्रणयाचे स्थान आहे.येथे शनी या दृष्टीने अनुकूल असत नाही.स्त्रियांच्या कुंडलीत या ठिकाणीं शनी असेल, पोटाचे विकार, पाठीचा त्रास , स्त्रियांच्या कुंडलीत शनी- हर्षल या स्थानी 2,5,1,6,9,10 राशीत शनी असेल,तर गर्भाशय आकुंचन पावेल.त्यामुळे गर्भधारणा होणार नाही. या ठिकाणी रवि-चंद्र असणे किंवा यापैकी एकाची अशुभ   दृष्टी असेल, तर आयुष्य दांपत्यसुखाचे जाणार नाही. कुटुंबात संतती दुःखाचे अर्थात मृत्यूसारखे प्रसंग येतात.  संतती- या ठिकाणी शुभ संबंधित शस्नी असून तो स्वगृही वा उच्च असेल, तर संतती उत्तम होते शनी हा  अशुभ व नीच राशीला किंवा अन्य अशुभ ग्रहाने युक्त असेल, तर संततीच्या बाबतीत फारच अनिष्ट व विचित्रपणा उत्पन्न करतो. मुले नियमितपणे होतात, पण त्यांना काहीतरी व्यंग असते. त्यांच्या हृदयाला विकार होतो. प्रसंगी अपत्यहिनताही येऊ शकते. 6, 10, 2 राशीचा शनी असता संतती सुख कमी असते. किंवा संतती नसतेच. एकंदरीत पंचम स्थानात शनी असता संतती – सौख्य कमी मिळते. विषम राशीतील शनी संततीच्या अंतरामधील पाळणा फार लांबवितो. सिंह राशीचा शनी मंगळाच्या प्रतियोगात किंवा केंद्रात असता मुलांच्या सुखाच्या बाबतीत खूपसारी असमाधानकारक फळे मिळतात या ठिकाणचा शनी  प्रसंगी २६ व्या वा ३०व्या वर्षी (क्रमशः)

Hari Anant
हरिअनंत,नाशिक  

भाग-१00
संपर्क-9096587586

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली