सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य:शनिशास्त्र

बातमीच्या वर

हरिअनंत,नाशिक

26 व्या वा 30 व्या वर्षी संतती देण्यास प्रारंभ करतो.  4, 12, 10 राशीचा शनी असता बरीच संतती होते. आणि विशेषतः कन्या संततीची संख्या जास्त असते. प्रथमतः कन्या आणी नंतर पुत्र संतती देतो. या राशी खेरीज इतर कोणत्याही राशीचा शनी असता संतती जास्त असत नाही. मात्र 11,1,9 राशीचा शनी असता अल्प संततीचा दोष असतो. शनी कोणत्याही राशीचा असून गुरू कोठेही वक्री असेल तर कितीही प्रयत्न केले तरी संतती होत नाही 11, 1,9 राशीचा शनी स्त्रियांच्या कुंडलीत पंचम स्थानी असता एखादे अपत्य होते नंतर 11- 12  केंव्हा केंव्हा 15 वर्षांनी मुले होतात. कधी कधी या ठिकाणचा शनी अनेक वेळा पुत्र शोक करवितो. 

वेळे प्रसंगी, वृद्धापकाळी कर्ता-सवर्त पुत्र  घालवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे पती-पत्नीच्या पंचम स्थानात शनी असता पुत्रशोक उत्पन्न करतो. या स्थानी शनी, राहू,हर्षल, केतू यांनी युक्त असता निपुत्रिक योग होतो. मात्र असा योग असून कुंडलीत गुरू कोठेही वक्री बलहीन असता संतती कितीही प्रयत्न केले तरी होत नाही . या स्थानी 7,11,3 राशीचा शनी असता पुत्र अतिशय बुद्धिमान होतो. इतर कोणत्याही राशीचा शनी असता  आपल्या जन्मदात्या माता-पित्याची कदर न करणारा व त्यांच्या आज्ञेत न राहणारी संतती होते. 

शनी जर या ठिकाणी वक्री असेल, तर  माता- पित्यास सुख मिळणार नाही. वृद्धापकाळी त्यांचे अतिशय हाल होतात. 7, 11, 3 खेरीज इतर राशीचा शनी या स्थानी असून हर्षल, रवि, चंद्र, गुरू यांचे अशुभ योग होत असतील अथवा शानु वक्री अथवा राहू, केतू, हर्षल व बुध यांनी युक्त असेल, तर एखादे मूल निश्चितपणे मूल अपंग असते.जन्मताच एखादे व्यंग, बुद्धीहीन असे मूल जन्मास येते. या ठिकाणचा शनी संतती  फार उशिरा देतो. दोन संततीत खूपचं यानंतर असते. शनी पाप ग्रहा बरोबर असता संतती देत नाही. या ठिकाणी शनी स्वगृही किंवा उच्च राशीचा असता पुत्र-सुख मिळते. 8,,1 राशीचा शनी असता संतती मूर्ख असते. 7,2 राशीचा शनी असता निश्चितपणे दत्तक घेण्याचा योग्य येतो. त्या दत्तक पुत्राकडून विशेष सुख प्राप्त होते. 3,6 राशीचा शनी असता कन्या संतती अधिक होते. 12, 9 राशीचा शनी असता कन्येसबंधी चिंता राहते.11, 10,7 राशीचा शनी असता पुत्र सुख प्राप्त झाले तरी (क्रमशः)  भाग-101

Hari Anant
हरिअनंत,नाशिक


 संपर्क -9096587586 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली