सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

बातमीच्या वर

 हरिअनंत,नाशिक 

10,11,7राशीचा शनी असता पुत्रसुख दिले ,तरी संततिपासून अतिशय कष्ट होतात. जर या ठिकाणी शनी बरोबर  रवी-चंद्र- मंगळ-राहू-केतू यांची युती होईल, तर  अथवा अशुभ दृष्टीयोग असता संततिचा विनाश होतो.त्यांना अनेक प्रकार व्यंग आढळतात. त्यांच्यापासून अति दुःख होते. हा अनुभव सदोदित येतो. शनी कर्क, मकर,मीन राशीत असता संतती संख्या 7 ते 11 पर्यन्त  होते.  पुत्र संतती लवकर होत  नाही .मेष, धनू, कुंभ राशीत शनी असता अल्प संतती  विशेष दोष समजावा.कोणत्याही राशीत शनी वक्री असून गुरू अष्टम स्थानी अगर कोठेही वक्री असेल,तर संतती होणार नाही. ह्या राशीत स्त्रियांच्या कुंडलीत शनी असता प्रथम एखादे मूल होते. नंतर 10-12 वर्षे मूल होत नाही व पुन्हा मुले होतात. या ठिकाणी शनी वक्री असता दोन मुलात अंतर सारखे असत नाही.संततीपासून  कधीही सुख मिळत नाही.

वृद्धपकाळात कर्ता- सवरता मुलगा जातो.स्त्री-पुरुषांच्या कुंडलीत पंचमात शनी असता आयुष्यात केंव्हातरी पुत्रशोक करावयास लावतो या ठिकाणी शनी,  राहू,केतू,हर्षल याने युक्त असता निपुत्रिक योग समजावा.असा योग गुरू कोठेही  वक्री , बलहीन असता संतती मुळीच होणार नाही.स्वभाव- या ठिकाणी शनी असता धर्मशील,चपळ,उत्तम रीतीने शत्रूवर विजय मिळविणारा होतो.बुद्धिमत्ता असूनही योग्य वेळी उत्तम कार्य करूनही मान- सन्मान मिळत नाही. असे काही वेळा घडते.तो कुटील उत्तम मुत्सद्दी, मोठ-मोठी कारस्थाने करणारा आळशी व चंचल असतो. लोक- विलक्षण गोष्टी करण्यात त्याचा हातखंडा असतो.

धनू राशीचा शनी असता आत एक, बाहेर एक असते.स्वभावात मी पणा असतो.व कोणावर  विश्वास ठेवीत नाही.8,X12,4चा शनी असता दुष्ट,खुनशी व भांडखोर वृत्तीचे असतात.6,10,2 या राशीत शनी असणारे लोक निरुपद्रवी,आपला धंदा बरा, आपण बरे,आनंदी,मौजी शौकीन असतात. 7,3,10राशीत शनी असणारे लोक विश्वासघातकी असतात.सिंह राशीत शनी असणारे लोक चिडखोर,लहरी, धाडशी असतात. प्रसंगी मंगळाच्या प्रतियोगात किंवा केंद्रात शनी असेल,तर जीवन काही प्रमाणात अपयशी ठरते. इच्छा चांगली असते.मात्र शत्रुत्व आयुष्यात कायम उत्पन्न झालेले असते. 

या ठिकाणी शनी असता स्वार्थी, राजकारणी, डावपेच खेळण्यात तरबेज,संशयी, अविश्वासू  11,10,7 राशीचा शनी असता वृत्ती खुनशी,स्वभाव कुत्सित, घमेंडखोर असतो.कर्क राशीचा शनी असता (क्रमशः)भाग-१०२ 

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 


संपर्क-9096587586

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली