सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

बातमीच्या वर

हरिअनंत,नाशिक 

कर्क राशीचा शनी असता कपटी. 9,12 राशीचा असता सतत धनाची चिंता करणे हा स्वभाव असतो भाग्य या ठिकाणी शुभ संबंधित शनी असता सार्वजनिक संस्था, मोठं- मोठी राजकारणे आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीबरोबर मैत्री ठेवणे या बाबतीत अनुकूलता मिळते.हा शनी नीचेचा अशुभ राशीचा किंवा अन्य ग्रहांच्या अशुभ योगाने युक्त असेल,तर दरिद्री व कामासक्त असतो. या स्थानात कोणत्याही राशीचा शनी असता,तरी आई-बापाचे सौख्य कमी असते. 8,5,4,1,9,12 या राशीचा शनी असता भाग्यकारक योग होतो.हे लोक स्वकष्टाने प्रगती करतात.7,3,11 या राशीचा शनी असता अतिशय कष्टाने तडजोड करीत पुढे यावे लागते.प्रसंगी पूर्वाजित कर्जही असते.10, 6, 2 राशीचा शनी असता पूर्वाजित धन मिळते,पण राहत नाही.

पंचम स्थानातील शनी एकंदरीत भाग्यदायक परंतु वरचेवर आपत्ती-विपत्ती येत असतात, परंतु मेघा नक्षत्राचा शनी असता रविशी शुभयोगात असता आयुष्यात केंव्हातरी महत्वाचा, भरभराटीचा योग आणतो व संपत्तीचा उत्कर्ष होतो.रविशी अन्योन्य योगात असेल, तर फळ जास्त मिळते. या स्थानातील शनी 1,5,9 राशीतील गुरूशी त्रिकोणात असणे एक महत्वाचे भाग्याचे लक्षण आहे.पूर्वा नक्षत्रातील शनी सामान्य फळ देतो.सांपात्तिक परिस्थिती  मध्यम प्रकारची असते. या ठिकाणी 2, 7 राशीचा शनी असता निर्धनच होतो. 7,10, 11राशीचा शनी असता भाग्यात नेहमी अडथळे येतात. शनी अशुभ राशीत,अशुभ ग्रहाच्या दृष्टीत युतीत असता व्यक्ती कमनशिबी असतात.

(शिक्षण) पंचमातील शनीबरोबर रवि- बुध- गुरुचे सबंध शुभ असतील, तर मोठे यश मिळते. रविने शनी अस्त असता विद्या प्राप्त होत नाही.हा शनी – नीच अशुभ राशीला अशुभ ग्रहाने युक्त असता बुद्धीहीन व चित्त विकल असते.पिशाच्च विद्देची आवडअसते. या ठिकाणचा शनी विद्देला नवीन प्रकारची धार व नवीन दृष्टी आणतो.पदवी प्राप्त होणे अशक्य झाले, तरी देखील नवीन शिकण्याचा हव्यास आयुष्यभर चालूच राहतो.संशोधनाची आवड असते.धनू राशीचा शनी असता विद्याभ्यास पूर्ण होतो.2,6,10 राशीचा शनी असता शिक्षण कमी होते.1,4, 5, 8 राशीचा शनी असता शिक्षण पूर्ण होत नाही.मात्र कुंडलीत बुध – गुरू बलवान असले तरचं थोडेशे यश येते, विद्ये करिता खूप मेहनत करावी लागते. तुळ,मकर, कुंभ राशीचा शनी असता बुद्धी मंद व (क्रमशः)  भाग-103

Hari Anant
हरिअनंत


संपर्क-9096587586

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली