सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

बातमीच्या वर

हरिअनंत,नाशिक 

तुळ, मकर, कुंभ राशीत शनी असता बुद्धी मंद, परीक्षेत अपयश. या ठिकाणी स्वतंत्र शनी असता व्यक्ती बुद्धिमान, व्यवहारीपणा असलेल्या दिसून आलेल्या आहेत. ज्ञानशाखेसाठी अभ्यासास दीर्घकाळ चिकाटी देतो. कायदेशास्त्राचा अभ्यास  करण्यासाठी येथील शनी फार चांगला नसतो. जर शनी बुध,गुरू हर्षल  बरोबर असेल अगर हे ग्रह तृतीय,प्रथम नवम स्थानात असता उच्च प्रकारची बुद्धी  देतो.अंगी बुद्धी असूनही काही  वेळा मान मिळत नाही, असे दिसून येते. 

या ठिकाणचा शनी बुध-मंगळाच्या शुभ योगात असता शास्त्रामध्ये  हमखास यश मिळते. या ठिकाणी शनी कितीही बलिष्ठ असला, तरी बुध- गुरू कुंडलीत  बलवान असल्याखेरीज विद्येत अपूर्व यश, प्रथम क्रमांक,स्कॉलरशिप, चढाओढीत यश मिळणे  कदापि शक्य नाही. कितीही प्रयत्न केले तरी या व्यक्तींना विद्येत यश प्राप्त होत नाही, काहींना काही अडचण यांच्या समोर उभीच असते. बुधाची व शनीची पंचम स्थानी युती होईल, तर कायद्याच्या अभ्यासात विषेश प्राविण्य संपादन करता येते.  पुढे आपल्या कर्तृत्वावर समाजात नाव लौकिकता मिळते.

इस्टेट या ठिकाणी शनी शुभसंबंधित असता इस्टेटीचा लाभ होतो. अचानक धन प्राप्ती होते. ध्यानी-मनी नसता न मिळणारी चुलत्याची शेती सहज मिळते. (आयुष्ययोग स्वतःचा व नातेवाईक ) या ठिकाणी शनी असता दीर्घायु होतो. हा शनी अशुभ राशीला किंवा अन्य ग्रहांच्या अशुभ योगाने युक्त असेल, तर पाण्यापासून किंवा उंच ठिकाणावर जाणे धोक्याचे असते.                      

या ठिकाणी वृश्चिक राशीत शनी असता पाण्यापासून भीती असते.शनी वयाच्या सहाव्या वर्षी अग्निपीडा देतो. तंटेबखेडे- या ठिकाणी सिंह राशीचा शनी मंगळाच्या प्रतियोगात किंवा केंद्रात असेल, तर (क्रमशः) भाग-104

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-096587586

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली