सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

सिंह राशीचा शनी मंगळाच्या प्रतियोगात असेल, तर आयुष्यात शत्रुत्व कायम उत्पन्न झालेले असते.अपघात व अरिष्ट या स्थानातील शनी अशुभ राशीत किंवा अन्य ग्रहांच्या अशुभ योगाने युक्त असेल नीचेचा असेल,तर प्रयत्न करूनही वारंवार अपयश येते. मित्र- मंडळीदेखील दुरलौकीक पसरवतात. सट्टा, लॉटरी, प्रेम- प्रकरण यात अपयश येते. वयाच्या पाचव्या वर्षी अग्निपासून पीडा होते. या ठिकाणी  शनी गुप्त शत्रू उत्पन्न करतो.

आजार- शनी नीचेचा अशुभ राशीला किंवा अन्य ग्रहांच्या अशुभ योगाने युक्त असेल, तर गुप्तरोग होतो.स्त्रीच्या कुंडलीत असा शनी अनिष्ट असेल, तर तो गर्भविकाराने सदैव पीडित असेल. रजोदर्शन नियमितपणे होत नाही व त्या वेळी पोटात दुखेल. जर हर्षल व शनी या स्थानी 3,6,7,2, 10, 11 राशीचे असतील, तर अगर कुठल्याही स्थानी असता गर्भाशयाचे मुख आकुंचित असल्याने गर्भधारणा होणार नाही व्यक्ती उन्मादरोगी अगर वातरोगी असते.

नातेवाईक- या ठिकाणी शनी असता स्त्री- पुत्रांचे सुख कमी मिळते. हा शनी नीचेचा अशुभ राशीला किंवा अन्य ग्रहांच्या अशुभ योगाने युक्त असता वयाच्या 5 व्या वर्षी बंधूचा नाश करतो.   अशुभयोग– पंचमात शनीशी रवि-चंद्र-  मंगळ- राहू-केतू यांच्याशी युती होईल,तर सर्वथा अनिष्ट समजावी,स्मृतीचा,निद्रानाश,दुःख,स्वप्ने,झोपेतून दचकून उठणे, बुद्धिमांद्य,आळस वगैरे गोष्टी घडतील

षष्ठस्थानी शनी असता- उद्योगधंदा,नोकरी वगैरे- या स्थानाचा शनी मादक पदार्थांच्या धंद्यापासून फायदा देतो. चित्रा नक्षत्री कन्या राशीतला शनी शैक्षणिक क्षेत्राशी सबंध आणतो. गणित,शास्त्रीय विषय व लेखनशैली या पासून  फायदा होतो.या स्थानातील शनिवर इतर ग्रहांचे अशुभ योग होत असतील , तर नोकरीमध्ये आजारीपणाची रजा बरीच काढावी लागते. त्यामुळे वरिष्ठ दर्जाची जागा मिळण्यामध्ये  व्यत्यय येतो. सरकारी नोकरीची पूर्ण मुदत भरण्याची वाट  पाहू नये. प्रसंगी पेन्शनही मिळणार नाही.हे लोक धंद्यामध्ये फार कडक व शिस्तीचे असतात. त्यामुळे बुडव्या व फसव्या अशी यांच्याबद्दल लोकांची समजूत असते.  

या ठिकाणी तुळ, कुंभ, मकर राशीत शनी असता अडी- अडचणींचा परिहार करून उत्कर्ष घडवून आणतो. त्यामुळे उद्योगधंदा, नोकरी यात अभ्युदय होतो. शेती, खाणी, तेलापासून किंवा यंत्रापासून अकस्मात (क्रमशः) भाग-105 

Hari Anant
हरिअनंत,नाशिक

संपर्क-9096587586