सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक   

परंतु मुलींच्या बाबतीत विवाहात अडथळे येतात. पती बीजवर अगर 10- 15वर्षाने मोठा असा मिळतो, पण पुरुषांच्या बाबतीत बरोबरीच्या वयाच्या मुलींशी विवाह होतो.11,10,9,5 राशीचा शनी असेल, तर वृद्ध कुमारीशी विवाह होतो. या ठिकाणी 9, 5, 1 राशीचा शनी असेल, तर विवाह होणार नाही. तसेच शनी- राहू, शनी- केतू, शनी- बुध असता अजन्म ब्रम्हचारी राहण्याचा योग येतो.

सप्तम स्थानी शनी,बुध असता विषय वासना कमी असते.त्यामुळे प्रणय वासनेचा अभाव असतो. स्त्रियांच्या कुंडलीत शनी- बुधाचा  योग झाला असता पती भित्रा, मंद बुद्धीचा, विकार शून्य, प्रेमरहीत असा मिळतो. स्त्रियांच्या कुंडलीत शनी- हर्षल सप्तम स्थानी असता वैधव्य प्राप्त होते. प्रसंगी घटस्फोट घेण्याचा प्रसंग येतो. पुरुषांच्या कुंडलीत शनी – हर्षल सप्तम स्थानी असून एखादा ग्रह वक्री असेल, तर बऱ्याच पत्नी मृत्युमुखी पडतात.या स्थानात शनी असता पत्नी रूपवती व प्रणयचतुर असणार नाहीच. शनी- राहुची युती असता काही संतती झाल्यावर द्विभार्या योग येतो व दाम्पत्यसुख असत नाही. शनी- राहूची युती शुभयोग करील, तर दाम्पत्यसुख बरे असते. पुरुषाच्या कुंडलीत शनी सप्तम स्थानी असता पत्नी कष्टाळू, मेहनती, कर्तव्यतत्पर संसारात रमणारी अशी असते. परंतु स्वतः पुरुष नितीमान असत नाही.

पत्नीच्या धाकामुळे थोडासा नमतो. अशा माणसाला विवाहानंतर काही काळ गंभीर व पोक्त विचारांची पत्नी आवडत नाही.पुरुषांच्या कुंडलीत शनी- केतूची युती असता  हाच योग स्त्रियांच्या कुंडलीत असता  स्त्रिया असंतुष्ट राहतात.त्यांचे प्रपंचात लक्ष लागत नाही. पुरुषाच्या कुंडलीत शनी नेपच्यूनची युती असता स्त्रीसुखाचा अभाव असतो. पत्नी अतृप्त वासनेची असते. सप्तम स्थानात शनी असता पत्नीचा दीर्घकाळ विरह होतो.                         

या ठिकाणी शनी स्वगृही उच्च राशीचा असता स्त्रीसुख मिळते. 8, 6, 3,1 राशीचा असेल,तर स्त्री दुराचरणी असते.7,2 राशीचा असता स्त्री कुरुप मिळते.कर्क,सिंह राशीत  वैवाहिक सुख लाभणे दुरापास्त असते. पत्नीस मारणे ,घराबाहेर काढणे या गोष्टी घडतात.त्यामुळे घराणे कमी दर्जाचे असते. स्वभाव व सवयी वाईट असतात. या ठिकाणी शनी पुरुषाचे पत्रिकेत 30 वर्षापर्यंत विवाह होतचं नाही. शनी हा शांत, विचारी वृत्तीचा असल्याने पत्नी शांत, विचारी,आधुनिकपणाची बाजू कमी असलेली मिळते. पत्नी दिसावयास प्रौढ,सावळी अशी असते. येथे शनी असून 12, 8, 2, 1 स्थानात मंगळ असता द्विभार्या योग येतो.कर्कराशीचा शनी असता जातक व स्त्री दोन्ही व्यभिचारीच असतात. मेष,कन्या,वृश्चिक,मकर राशीत शनी असता द्विभार्या योग येतो. इतर राशीत येत नाही. या राशीत शनी असता प्रथम पत्नी रूपाने (क्रमशः) भाग-110

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586