सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक    

(Shani Shastra)10,8,11,2,3, 7,राशीचा शनी असता अत्यंत अभ्यासू, विचारी, शोधक बुद्धीचे असतात. कायदा, यंत्रशास्त्र, खनिज पदार्थशास्त्र,भूगर्भशास्त्र, मानसशास्त्र, यांत्रिकशास्त्र वगैरे विद्देची आवड असते.जर यांत्रिक शास्त्राची आवड नसेल, तर कायदा,अर्थशास्त्रात याची आवड निर्माण करतो. या ठिकाणचा शनी बुद्धिमत्तेच्या दृष्टीने प्रगल्भ बुद्धी देतो. न्यायवृत्ती व बुद्धी असते. कायदेशास्त्र,तत्वज्ञान ह्याचा अनेक  वर्षे तन्मयतेने अभ्यास होतो. 

जीवनापयोगी शास्त्रीय संशोधनात पेटंन्ट मिळणे शक्य असते या स्थानी उत्तराषाढा नक्षत्रात अथवा 12,9,8,5,4,3,1 या राशीत शनी असता वडिलोपार्जित घर, शेतीवाडी व इतर इस्टेट  जाण्याचा संभव असतो. बराच काळ वडीलोपार्जित इस्टेटीचा उपभोग घेतात.11,10,7,6,2, राशीत शनी असता वडिलोपार्जित इस्टेट असत नाही. असली तरी वयाच्या 35 व्या वर्षाच्या सुमारास नष्ट होते. त्या इस्टेटीत भर पडत नाही व दारिद्र्य निर्माण करतो. या ठिकाणचा शनी पीडित असता  वडिलोपार्जित  इस्टेट मिळण्यास त्रास पडतो.

या ठिकाणी शनी असता भावंडं,भावजयी अचानक आजारी पडतात लवकर निदान होत नाही.12,8,4 राशीचा शनी असून तो शुभ संबंधित असता मनुष्य पुण्यकर्म करीत असतानाच प्राणांतिक  शारीरिक वेदना सहन करीत उर्वरीत जीवन व्यतीत करतो.या ठिकाणी शनी वक्री असून षष्ठातून हर्षल अगर मंगळ केंद्रयोग करीत असतील, तर  निश्चचितपणे बंधनयोग समजावा.         

12,9,6,3राशीत शनी (Shani Shastra)असता रवि- मंगळ- बुध याचे अशुभ योग् असताअनेक छोटे- मोठे संकटे निर्माण करील. बंधन योगही  होऊ शकेल. वृश्चिकेत शनी असता लोकांचा नावलौकिक चांगला राहत नाही. या ठिकाणचा शनी शत्रुत्व वाढवितो.या स्थानी शनी असता श्वापद, स्त्री, नातेवाईक यापासून मोठी हानी होते. या ठिकाणी शनी असता नेत्रपीडा, वातरोग होतो. 8 व1 राशीत शनी असता वेडेपणा, चित्तभ्रम, भटकणे इ.गोष्टी घडतात.

या ठिकाणी 11,9,7,6,5,3,2,1 या राशीत शनी असता पाठीवरचा भाऊ नसतो अथवा ठेवीत नाहीत. 11,10,7,6,2, राशीत शनी असता  पित्याचे सौख्य लवकर नष्ट होते. पिता असला तरी त्याच्याशी पटत नाही. तसेच बंधुशी पटत नाही व वेळेप्रसंगी वेगळे रहावे लागते. या स्थानी शनी असता  आप्तेष्टांशी बेबनाव होतो. 

या ठिकाणी शनी असता पित्याचा पुत्राशी छत्तीसचा आकडा असतो. 6,3 राशीचस शनी असता पितृसुख लाभत नाही. येथील शनीने कुटुंबियास सौख्य लाभत नाही. मातृ-पितृ सुखाचा अभाव. बंधू- भगिनीपासून पीडा. येथे शनी असून दशमात रवि- चंद्र असता वडीलांचे सौख्य देत नाही. दशम स्थानी म्हणजे कर्मस्थानी शनी असता (क्रमशः)  भाग-११७ (Shani Shastra)

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक    

संपर्क-9096587586