सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

Shani Shastra

दशम स्थानी म्हणजे कर्मस्थानी शनी असता उद्योगधंदा नोकरी वगैरे या स्थानी 1,3, 5,9 राशीचा शनी असता संधोधक, प्रोफेसर,अधिकारी,गुढशास्त्र अथवा व्यापारी होतो.12,10,11,6,7,8,2,4 या राशीत शनी असता धर्मपंथ स्थापन करणारा अथवा संन्याशी, लेखक,पत्रकार, गुढशास्त्राचा अभ्यासक, ज्योतिषी,ग्रामपंचायत अशा संस्थेमध्ये मेंबर होतात. 12,10,8,9,5,1,3,4 या राशीत शनी असता कायद्याचे पदवीधर, न्यायाधीश, पोलीस,मिलिटरी व अबकारी खात्यामध्ये अधिकारी असतात. 

एखादी संस्था स्थापन करणे, एखाद्या टेक्नॉंलॉजीची पदवी घेणे इ. गोष्टी साध्य होतात. 11,10,6,7,2 राशीत शनी ( Shani Shastra )असता जगास ज्ञान देणारे लेखक, ग्रंथकार होतात. कॉन्ट्रॅक्टर, परदेशी मालाच्या धंद्याचे एजंट होतात.यांना धंद्याचे वर्म लवकर समजते.6,4,8,1 राशीचा शनी असता सरकारी नोकरी असता वयाच्या 42व्या वर्षापर्यंत भाग्योदय होत नाही. येथेच शनी वक्री असेल व हर्षल, मंगळ व नेपच्यून यांचे केंद्रयोग होतील तर अधिक वाईट फले मिळतील. तसेच राविचा अशुभ योग होईल तर नोकरीत खाली येणे,सस्पेंड होणे, अगर बडतर्फ होणे असे योग घडतात. 

या अशुभ योगाने धंद्याचे दिवाळे निघते.11,7,12,3 या राशींचा शनी शुभदृष्ट असता फार मोठे भाग्याचे लक्षण समजावे. या योगाने शनीचा खरा पराक्रम दिसून येतो.कर्तुमकर्तुम शक्ती या ठिकाणी दिसून येते. कारकुचा ऑफिसर, रंकाचा राव, कामगाराचा कारखानदार व शेतीतज्ज्ञ होतो. मात्र या ठिकाणी शनी वक्री असेल, तर निराशा होऊनही शेवटी उत्कर्ष होतो. 

या स्थानातील शनीचे वैशिष्ट्य असे आहे की, भल्याभल्या मेरूपर्वता एव्हढे ऐश्वर्य देतो व तितक्याच त्वरेने  खाली आणतो. विशेषतः 11, 7,2 राशीचा शनी असलेल्या व्यक्ती मोठ्या श्रीमंताकडे अथवा धनाढ्य व्यापाऱ्यांकडे  दिवानजी ( सेक्रेटरी) सचिवालयातील मोठ्या अधिकाराच्या जागा, अर्थखाते, पोस्ट, रेल्वे व हिशोब खात्यातील उच्च जागा मिळवतात. कुंभ राशीत शनी असता विमा कंपन्या,  जमाबंदी व आकडे खात्याशी सबंध असलेल्या ठिकाणी नोकरी देतो. त्याच प्रमाणे कायदेकानूनशी सबंध येणाऱ्या गोष्टीशी सबंध ठेवतो व मिथुन, तुळ आणि कुंभ राशीचा शनी असेल, तर या ठिकाणी नोकरी देतो.उत्कर्षही करतो. 10,2,6 राशीचा शनी (क्रमशः) ( Shani Shastra )  

भाग -११८

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 


संपर्क- 9096587586