सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

(Shani Shastra) 2,6,10 राशीचा शनी ठेकेदारी,कॉन्ट्रॅक्टरच्या कामात फायदा देतो.12,11,7,3 राशीस शनी वक्री असून त्यावर अशुभ योग्य असतील,तरीही रवि, चंद्र, गुरू यांचे शुभ योग होत असतील, तर अशा व्यक्ती मोठ्या विद्वान असतात. आपल्या बुद्धिमत्तेने लोकांस चकित करतात.ग्रंथ लेखन करतात,अशा व्यक्ती वकिली व्यवसायात असतील तर याना विशेष पैसा मिळत नाही म्हणून कायद्याचे पुस्तके लिहून निर्वाह करतात. अथवा शिक्षण व्यवसायात नोकरी करतात.    

महत्वाचे 11,10,7,3 राशीचा शनी(Shani Shastra) असता शनीचे मिळणारे फळ व भाग्य  अखेर पर्यंत टिकून राहत नाही मात्र शनी थोडासा दूषित असेल व दशम स्थानच्याशेवंतच्या अंशात असेल, तर व्यवसायात जम बसणार नाही व दीर्घकाळ अधिकार भोगलेल्या स्थितीत मध्येच आघात करील. म्हणून या ठिकाणचे शनीचे फळ पाहताना सावधगिरी ठेवावी. दशमात शनी शुभ संबंधित असलेल्या व्यक्ती पितृधनाचा नाश न करणारे, स्वतः पुढे येणारे अत्यन्त कर्तबगार व भाग्यशाली समजावे

1) दशमस्थ शनी असता कोणतेच निर्बंध आड येऊ शकत नाहीत.आपल्या गुणाने अनिष्ट परिस्थिती भेद करून उच्च दर्जाला पोहोचतात 
2) येथील शनिवर रवि, मंगळ, गुरू यांचे शुभयोग सत्ता, ऐश्वर्य देतात.
3) शनी- मंगळ शुभयोग विशेषतः सरकारी अधिकारी राजकारणाच्या बाबतीत महत्वाचे असतात.                   
4) गुरूचा-शनीचा दृष्टी शुभयोग व्यापाराकरिता उपयोग होतो.             
5) बुध आणि शनी दृष्टी शुभयोग अत्यंत प्रभावशाली असतो. सरकारी नोकरी ,अधिकारी,इंजिनियर्स, जमिनीचे सर्व्हे करणारे,व्यापारी, व्यवस्थापक,प्रचारक, सॉलिसिटर, प्रिंटिंगप्रेस, शास्त्रज्ञ, शिल्पज्ञ कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम करणारे,खाणीचे,  इंजिनिअर्स, दगडी कोळशाचे व्यापारी  अशा व्यक्ती उत्तम कामे करू शकतात. सिमेंट क्रॉंकीट, विटा यांचे धंदे करणारे,दगडी कोळसा वाहतूक करणारे लोक या व्यक्ती, माती खाणीचे धंदे करणारे याना बुध- शनी दृष्टियोग अत्यंत फायदेशीर.                
6) या ठिकाणी शनी असता मोठ्या भाग्याचे लक्षण समजावे. कारण हाच शनी आयुष्यात अनेक स्थित्यांतरे, क्रांती लालसा,अवाढव्य संपत्ती वगैरे देण्यास कारणीभूत आहे. शनी आयुष्यात अनेक आश्चर्यकारक घटना घडवतो

7) या ठिकाणी 11,10,7 राशीत शस्नी असता रॉकेल,पेट्रोल,विमाने, मोटारी यापैकी कोणता तरी एखादा शनीचा व्यवसाय होण्यासारखा असतो (क्रमशः) (Shani Shastra)
भाग-११९  

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586