सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

Shani Shastra

या ठिकाणी 11, 10,7,राशीत शनी (Shani Shastra) असता पेट्रोल,रॉकेल, विमाने, मोटारी यापैकी कोणता तरी शनीचा उद्योग निश्चित होण्यासारखा असतो. दशमस्थ कोणताही ग्रह नसेल, तर त्यास्थानी जी राशी असेल त्या राशीच्या स्वामी प्रमाणे अनुकूल व प्रतिकूल फळे मिळतील. तो शुभ ग्रह असून 11,7,4, 2,1,स्थानात असता शुभ फळे जास्त 9,5,3,स्थानी असता शुभ फळे कमी 12,8,6,स्थानी असता संमिश्र फळे. 11,7,4,2, स्थानात पापग्रह असल्यास शुभ फळे मिळणार नाहीत. पापग्रह 9, 5,3,स्थानी असता संमिश्र फळे मिळतील.या स्थानी 12,9,8,5,4,3,1या राशीत शनी असता स्त्री-सौख्य कमी मिळते. दोन विवाह होतात.वृद्धपकाळात देखील स्त्री जवळ पाहिजे असे मानण्याइतके हे विचित्र स्वभावाचे असतात.  

12,8,4,9,5,1 राशीतला शनी(Shani Shastra) असता व्यक्ती अति महत्वकांक्षी,उद्योगी,अत्यंत कर्तबगार असू शकतात. या राशी शनी उत्कर्ष करतो. उत्कर्षानंतर क्रमशः उद्योगधंदा चालेनासा होत बंद होतो  वरील राशीत शनी, रवि, चंद्र व गुरू यांचे अशुभ दृष्टीत असेल किंवा राहुशी युती असेल, तर अशाना अखेर उद्योगधंदा, नोकरी यात अपयश येते. उद्योगधंदा बुडतो. नोकरी जाते,बंधनयोग येतो. दशमस्थ शनी निरबल राशीत असता इतर ग्रहांचे अशुभ दृष्टियोग असता अतिनुकसान, विपन्नवस्था होऊ शकते. या व्यक्ती दिर्घोद्योगी व कर्तव्यनिष्ठ असतात, पण त्यांचा काही उपयोग होत नाही. त्यांना संधी मिळत नाही.अडथळे,विलंब, निराशा होते.अशा व्यक्ती व्यापारी असले तर पत जाऊन विपरीत नुकसान होते. वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर याना अपकीर्ती, अपयश येते. कीर्ती नाहीशी होते. राजकारणी व्यक्तींना, सार्वजनिक संस्थेत असणाऱ्या व्यक्तींना निवडणुकीत, सार्वजनिक कामात अपयश येते, कीर्ती नाहीशी होते. 

या स्थानी 12,9,8,5,4,3,1 या राशीत शनी असता,पुत्रसंतती होत नाही, झालीच तर त्यापासून सौख्य होत नाही. या ठिकाणचा शनी बिघडला असता वंशक्षय होतो.7,2,राशीचा शनी असता तीर्थयात्रा घडते. या ठिकाणी शनी असता मानमान्यतेचा अभिलाशी, हुकूमशाही वृत्ती,अहंपणा,स्वतःबद्दल नुसत्या कल्पना, कल्पनाशक्ती महत्वकांक्षेपेक्षा चातुर्य वापरण्याची कल्पना असते. 

या ठिकाणी 12,9,8,5,4,3,1 या राशीत शनी असता या व्यक्ती वागण्यात अनासक्त असतात. जगाची उठाठेव करण्याकडे लक्ष फार असून स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष असते. मानसन्मानाला हापापलेले असतात . आपल्या हातून काहीतरी दिव्य व्हावे असे वाटत असते. अतिशय घमेंडखोरअसून दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याची यांची वृत्ती असते. मकर राशीतला शनी (Shani Shastra) स्वभाव संशयी बनवतो (क्रमशः)   भाग-१२०

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक


संपर्क- 9096587586