सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

10,7,4,1राशीत शनी असून रवि- चंद्र मंगळाच्या अशुभ दृष्टीमध्ये असेल तर आयुष्यात नेहमी अपयश येते. 11,8,5,2 राशीचा शनी असता पूर्वार्धात फार निराशा व भाग्योदयाच्या कामी विलंब लागतो. या ठिकाणी शनी असता व्यक्ती भोगी,धन मिळविणारा, तेजस्वी सत्संगामुळे अंतःकरण निर्मळ झालेला. नीतिमान,सुस्थळी राहणारा असा असतो. 11,10,7,3,या राशीच्या शनी असून तो शुभसंबंधित असेल, तर आयुष्यात मोठेमोठे लाभ होतात. आयुष्याचा पूर्वार्ध पूर्ण सुखात जातो. 

या ठिकाणीं शनी असता वयाच्या 24व्या वर्षी धनलाभ होतो. सार्वजनिक क्षेत्रात चमकणारा, समाजसेवक,नेतृत्वशक्ती उत्तम, इच्छा नसतानाही कोर्टात जावेच लागते.  या स्थानी शततारका नक्षत्रात शनी असता कुशाग्र बुद्धी, विवरणपद्धती व बौद्धिक पृथक्करण-पद्धती चांगली असते. येथे शनी असलेल्या व्यक्ती आर्थिक व्यवहार जास्त विचाराने करतात. पैशासाठी कष्ट करणारे असतात. पैसा साठविण्यासाठी धडपड करून भाग्यवृद्धीकडे लक्ष देणारे असतात.   

या स्थानात शनी असता पूर्ववयात प्रकृती चांगली राहत नाही.   या स्थानी  शनी(Shani Shastra) असता मित्र फार थोडे असतात. त्यांच्याकडून फायदा होत नाही. त्यातल्या त्यात 12,8,4 राशीचा शनी असता नुकसान होते. या ठिकाणी शनी असता मातेचा अल्पकाळात मृत्यूयोग  संभवतो. मातेशी मतभेदाचा योग येतो. या ठिकाणी 11,10,7 राशीचा शनी असता कौंटुबिक सुख चांगले मिळत नाही. नेहमी कष्टी त्यामुळे नेहमी उदास असतात.   

या स्थानात 8,4,1राशीचा शनी (Shani Shastra) असता शत्रूवर जय मिळतो. कोणत्याही संकटाबरोबर खंबीरपणे लढतात.या स्थानातील शनी एकदा तरी कोर्टात उभे करतो. वाहनाच्या अपघाताने घायाळ होण्याची शक्यता असते.द्वादशस्थानी म्हणजे व्यवस्थानी शनी असता  या स्थानात शनी असता कायदेपंडित, डॉक्टर, रासायनशास्त्रज्ञ या विषयाच्या उद्योगात पुढे येतात.पूर्वभाद्रपदा नक्षत्री शनी असता कोर्टातील नोकरी,खाजगी चिटणीस,सल्लागार,कस्टम किंवा दवाखाना वगैरेशी  नोकरीचा संबंध येतो.रेवती नक्षत्रात मीन राशीत शनी असता विश्ववस्त म्हणून काम पाहण्याचा योग येतो. 

धर्मसंस्था, देवालय यांच्याशी संबंध येतो. कायदा व धर्मशास्त्र यांच्याशी संबंध येतो. 11, 10,7,3,2,1 या राशीतला शनी (Shani Shastra) काही अंशी बुद्धी,विद्या, कर्तबगारी,विद्वत्ता या बाबतीत उत्तम परिणाम करील.त्या योगाने उत्तम वकील,विद्वान , शास्त्रज्ञ  व नामांकित असा व्यक्ती होतो. या ठिकाणी शनी स्वगृहीचा, उच्च राशीचा असता धनवान होतो. हे स्थान  खरे म्हटले तर उद्योगधंद्याचे नाही. जर द्वादशस्थानी शनी असेल,तर (क्रमशः)
 भाग-१२४  

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक

संपर्क-9096587586