सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

 हरिअनंत,नाशिक

जीवनात योग्य संधी,भाग्य हयातीत लाभत नाही. या स्थानी 12,9,8,5,4,3,1 या राशीतील शनी (Shani) असेल, तर ह्या व्यक्ती कोणत्यातरी एका विषयात प्रवीण असतात. बुद्धी अतिशय तीव्र असते. कायदेपंडित, राजकारण खेळणारे, विद्वान असे असतात.या खेरीज इतर राशीचा शनी असता मंद बुद्धी,ठग व मूर्ख असतात. स्वतःचा व नातेवाईकांचा या स्थानी शनी असता अतिशय मानसिक त्रास होतो. नातेवाईकव अतिशय घनिष्ठ संबंधित व्यक्तींच्या विरहाने या व्यक्ती अतिशय दुःखी होतात.रवि अगर चंद्राचे अशुभ दृष्टियोगाने अगदी जवळच्या प्रिय व्यक्तीला हृदयविकाराचा अति तीव्र त्रास होतो. 

कुंडलीतील शुक्र शनीने बिघडला असल्यास पादरोग, थंडी किंवा दमा या सारखे  रोग होतात.या ठिकाणी शनी (Shani) असता व्रणरोगी असतो. लहानपणी फार शारीरिक पीडा देतो. 8,1 राशीचा शनी असता रोगी 7,2 राशीचा असता नेहमी रुग्ण असतो. 6,3 राशीचा असता शरीरात दोष असतो.कर्क राशीचा असता नेत्रविकार होतात.9,5 राशीचा असता शरीराने रोगी राहतो. या स्थानी 11,10,7,6,2 या राशीचा शनी असता माता- पित्यांचे सौख्य चांगले मिळते. या स्थानाचा शनी चुलते व भाऊबंद यांच्याकडून नुकसान देतो. 11,10,7,3,2 राशीचा शनी असून रवि अगर चंद्र यांच्या अशुभ दृष्टियोगाने अगदी जवळच्या प्रिय व आप्तांचा भयंकर पीडादायक शारीरिक त्रास होण्याचा संभव असतो. 

12,9 राशीचा शनी (Shani) असता आजोळचे मनसोक्त सुख प्राप्त होते. या ठिकाणचा शनी क्लेश,आपत्ती, बंदिवास घडवितो. या स्थानी शनी वक्री असून मंगळ, हर्षल अगर चंद्राच्या अशुभ योगात असल्यास राजकीय संकटे, बंदिवास सोसावा लागतो. तसेच शनी अशुभ राशीस असून गुरू,रवि, चंद्र अगर मंगळ यांच्या अशुभ दृष्टीत असेल,तर दिवाणी तुरुंग भोगण्याची पाळी येते. 11,10,7,3,2 या राशीचा शनी असून बरोबर बुध असेल, हर्षल, रवि मंगळाचा अगर चंद्राचा अशुभ योग होत असेल,तर राजकीय संकटे, बंदीवास घडतो.

शनी- हर्षलचा अशुभ योग होत असेल, तर मोठ्या लोकांशी कारण नसता शत्रुत्व उत्पन्न होते. अब्रू व पत जाते.12,8,4,9,5,1 राशीचा शनी (Shani) असता व तो अशुभ दृष्टीत असता  तेथे शनी वक्री असून 9,6 स्थानातील ग्रहाशी प्रतियोग अगर केंद्रयोग करीत असेल,तर गुप्त शत्रूपासून अतिशय त्रास होतो. कायदेशीर भानगडी, सरकारी,फौजदारी वगैरे विविध भानगडी होण्याचा संभव असतो. येथील शनी- हर्षलचे किंवा चंद्र- शनीचे अशुभ दृष्टियोगात असेल,तर हाताखालील नोकर, मजूर यांचे भांडणे सुरू होतात. चोरलुटारू यांच्याकडून नुकसान होते. मनात आत्महत्येचा विचार थैमान घालतो.(क्रमशः)  भाग – १२८

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक

  संपर्क- 9096587586