सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

येथील शनी-हर्षल  किंवा चंद्र शनीचे (Shani) दृष्टीयोगात असेल,तर अतिशय जवळच्या व्यक्ती,कधीतरी नाराज झालेले नातेवाईक तोंडावर गोड बोलत अतिशय  गुप्तपणे एखाद्या निर्दयी शत्रूप्रमाणे  विविध कारवाया करून त्रास देतात.  कारण नसताना  कायदेशीर भानगडीत नकळत अडकले जातात. त्या भानगडीतून सुटण्याच्या प्रयत्नात  फौजदारी भानगडीत गुंतण्याची शक्यता अधिकच वाढते. या स्थानाचा शनी (Shani) पीडित असेल, पूर्व जन्मीच्या चुकीच्या  घटनेत  कुणी अतिशय तळमळीने शाप दिला असेल,तर त्या शापाचा परिणाम म्हणजे मनात कारण नसताना भीती वाटते, त्या भीतीचं कारण ही स्पष्टपणे कळत नाही. झोपेत अचानक भीतीने व्यक्ती जागी होते. अपघाताचे भय वाढते. 

या स्थानी 12,9,8,5,4,3,1 राशीचा शनी (Shani) असता शरीराने थोडा सडपातळ व कणा असतो. या व्यक्तींनी आपली तब्बेत सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तब्बेतीत  फरक पडत नाही. या ठिकाणी शनी असता व्यक्ती ठेंगणी व डोळ्यात व्यंग असते. अशा व्यक्ती मुळात अतिशय खोडकर असतात. नकळतपणे समोरच्या व्यक्तीला कारण नसताना कोणत्या प्रकारे त्रास देऊन हैराण करण्याची  कला प्राप्त असते. या व्यक्ती आपलं स्वतःच हित साधण्यासाठी गुप्तपणे कोणत्याही थराला जाऊ शकतात. याना परिणामाची भीती वाटत नाही. द्वादश स्थानातील शनीची फळे  या ठिकाणी शनी असणे फारच दुर्दैवाचे लक्षण आहे.  निष्कारण शत्रुत्व निर्माण होतं कारण नसताना आरोप होतो. अचानक आपत्ती येते. त्या आपत्तीतून सुटण्याच्या प्रयत्नात नवीनच संकट अचानक निर्माण होतं. कारण नसताना ध्यानाचा नाद होतो. संबंध नसताना म्हणजे रस्त्याने जाताना एखाद्याचे भांडण,मारामारी सुरू असताना सहज गंमत म्हणून क्षणभर भांडण बघण्यासाठी थांबताच त्या भांडणात या व्यक्तींना  त्या भांडणाचा सूत्रधार म्हणून तुरुंगवास भोगावा लागतो. 

पती- पत्नीत एकमेकांविषयी संशय निर्माण होतो, या संशयाचा परिणाम  एकमेकांपासून दोघे विभक्त होतात. उद्योग- नोकरीत अडथळे निर्माण होतात. अतिशय जवळची व्यक्ती विश्वासू व्यक्ती विश्वासघात करते. अफरातफरीच्या प्रकरणात कारण नसता या व्यक्ती अडकतात. अपघात होतो या अपघातात  शरीराचा एखादा अवयव  पूर्णपणे निकामी होतो.  नको त्या व्यसनात या व्यक्ती गुंततात. अपमृत्यू , दीर्घकाळ आजार,मत्सर, स्वार्थ, नास्तिकपणा, व्यसनासक्ती 8,1राशीचा  शनी असता चोरी , लबाडी करण्याची वृत्ती. दुसऱ्याचे बरे जाहलेले या व्यक्तींना आवडत नाही. पती- पत्नी परस्परांस छळत असता (क्रमशः)  भाग – १२९

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

संपर्क- 9096587586