सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

८ ,१ राशीचा शनी (Shani) असता चोरी लबाडी करण्याची वृत्ती, या व्यक्तींनी कितीही चांगलं वागण्याचा निश्चय केला तरी यांचा निश्चय खुप वेळ टिकत नाही. सवयी प्रमाणे यांच्या वृत्तीत बदल होत नाही. यांच्या या वृत्तीचा त्रास यांच्या कुटुंबातील व्यक्तींना होतो. दुसऱ्याचे बरे झाहलेले याना आवडत नाही. पती पत्नी परस्परास छळत असतात.अशा व्यक्तींच्या घरात पूर्वपुण्याई समाप्त होत आलेली आहे असे निश्चित समजावे. या व्यक्तींनी दानधर्म केला, आजारी अनोळखी व्यक्तींची निस्वार्थ सेवा केली.. अनाथ बालकांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारून उत्तमरीत्या पार पाडली, तर निश्चित यांचं जीवन बदलू शकते मात्र असं क्वचित घडते. यांच्या वाईट सवयीमुळे अनेकदा याना शारीरिक छळ सोसावा लागतो. 

11,10,7 राशीचा शनी (Shani) असेल,तर अशुभ परिणाम थोडे कमी होतात. या ठिकाणी राहू आणि केतू शनिशी युती वाईट. त्यातले त्यात 6,3 राशीस शनी- राहू युती धनु आणि मीन राशीस शनी- केतू यांची युती होईल, तर अनिष्ट परिणाम थोडे कमी होतील.राहू व शनी-या दोन ग्रहांत शुभ योगात युती असेल,तर बुद्धी सखोल, परिपक्व आणि गूढ. यांच्या बुद्धीचा थांग लागत नाही, या व्यक्तींचे वागणे लोकविलक्षण असते. व्यापार धंद्यात धोरणी.  अमाप पैसा मिळवतात, पण या पैशांचा लोकांना, नातेवाईकांना  बाहेर कधीच अंदाज लागत नाही

 बँकिंग, मोठमोठ्या गिरण्या,फर्मस, कंपन्या, शेअर -दोन नंबरचे मोठमोठे धंदे, इम्पोर्ट- एक्सपोर्टचा व्यापार, या  व्यक्ती धंदा कोणताही करोत, नावारूपास येतात.दयाळू, मायाळू पण खोटी माया नव्हे. आणि हे सर्व घडतं ते शनिमुळे (Shani) मात्र या व्यक्तींना याची जाणीव देखील नसते. अतिशय शांत वृत्तीचे,जन्मजात अंगात मोठेपणा  असणारे. अंगात कोणतीही विद्या अगर कला असो ती जन्मजात असते. जास्त शिकलेले नसतात, पण अति विद्वान आहेत, अशी समजूत होते. अत्यंत व्यवहारी, नेहमी लोकांचे ऐकून आपल्या मनाला पटेल तेच करणारे. बोलणे थोडे, नेमके व मर्मभेदक, कृती जास्त नेहमी लोकांचे कल्याण करणारे. (असा याचा अर्थ) नव्हे.आत्मविश्वास अति दांडगा. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास.दैवावर व देवावर व शनिवर मुळीचं विश्वास नसलेल्या ह्या व्यक्तींना यांनी अहंकाराच्या मस्तीत केलेल्या सर्व चुकांची योग्य वेळी यांना भरपाई करावी लागते. 

या व्यक्तींना शनी योग्य वेळी धडा शिकऊन योग्य वळणावर आणतो. ही राहू-शनी (Shani) युती लग्नात मेष,सिंह, धनू, कर्क,वृश्चिक, मीन राशीत असेल, तर दीर्घायु. लहानपणीच माता-पित्यापैकी कोणाचा तरी मृत्यूयोग होतो लहानपणीच अत्यन्त दुःख व उपजीविकेत अडथळे. विवाह एकचं  दुसरा विवाह झाला की, (क्रमशः) भाग – (१३०)

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक


संपर्क- 90965875868