सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

राहू व शनी ही युती लग्नात मेष,सिंह,धनु,कर्क,वृश्चिक, मीन राशीत असेल,तर दिर्घायु. लहानपणीच माता- पित्यापैकी कोणाचा तरी मृत्यू योग संभवतो.अत्यंत दुःख व उपजीविकेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.विवाह एकच तसेच पुत्र संतती होण्यालाअडचण,पण पुढे येतात.बाकीच्या राशीत शुभ फळ देतो. धनस्थानात शुभ युतीत शुभ राशीत असून इतर ग्रहांशी शुभ योगात असेल, तर विवाह एकच, संतती पुष्कळ होते. पूर्वनियोजित धन असते. त्यात भर घालतात. विशेषतः नोकरी करणारे व कमी धंदा करणारे भेटतात. 

यातच शुभ युतीत शुभ राशीत असून इतर ग्रहांशी अशुभ योगात असेल,तर पूर्वार्जित इस्टेट असत नाही. लहानपणी मामा- मावशीकडे जन्म काढावा लागतो. विवाह होत नाही अगर बहू भार्या योग होतो. नोकरीत पुढे येतो. वरिष्ठांची मर्जी बसते. संतती पुष्कळ होते. द्वितीय विवाहापासून भाग्योदयाला सुरुवात होते.सुख- समाधानाने पेन्शन घेतात. घरदार होते.  तृतीयात शुभ राशीत शुभ युतीत असेल, तर वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत अति कष्ट. लहानपणीच आई जाते व आईनंतर थोड्याच काळात वडील जातात. भावाशी पटत नाही. समजुतीने वेगळे होतात. आस्ते -आस्ते भाग्योदय होतो व भाग्योदय शेवटपर्यंत टिकतो. 

भावाशी मिळून राहील, तर भाग्योदय नडतो. स्वभावाने शांत, थंड असतो. विवाह एकच होतो. धंद्यात अगर नोकरीत स्थिरस्थावर राहतो,चतुर्थात शुभ युतीत असेल, तर ही युती पैसे भरपूर देईल,पण पुत्र संतती देणार नाही. जर पुत्र संतती भरपूर झाली, तर पैसा देणार नाही. पितृसौख्य लवकर नष्ट होते.मातृसौख्य भरपूर मिळते. मोठ- मोठे धंदे करून पुढे येतात.पुष्कळ पैसा दानधर्म करतात. नावलौकिक होतो. मागे नाव ठेवतात. जर पैसे मुबलक मिळविला, नावलौकिक झाला, तर पुत्र संततीकरता दुसरी बायको करून घ्यावी लागते.दत्तक घेण्याचा योग येतो. 

याच लोकांनी आश्चर्य करण्यासारखा मोठ- मोठ्या संस्थांना दानधर्म केला आहे. स्वभावाने उदार पण अतीशय आळशी  माणसाला उदारतेच्या नावाखाली पोसणार नाहीत आणि ज्या माणसावर अगर संस्थेवर विश्वास नाही त्यांना कवडीचीही मदत करावयास तयार होत नाहीत. हे लोक अति बुद्धिमान असतात. संसारात कसे वागावे ते पूर्णपणे कळत असते. प्रसंगावधानी, बहुश्रुतपणा व वाचनाचे व्यासंगी असतात. याना आपला मृत्यू कळत असतो. ह्या व्यक्ती व्यापार, इमारतीचे सामान, दगड, रेती,माती, सीमेंट इत्यादी इमारतीचे उपयोगी व्यवसाय करतात. यातच यांचा भाग्योदय..(क्रमशः)भाग-१३१ 

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586