सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

दगड,रेती, माती व सीमेंट इमारतीचे उपयोगीचे किफायतशीर व्यवसाय करतात व यातच यांचा भाग्योदय होतो. ही शनी– राहू युती पंचमस्थानी असेल तर विवाहाला अति विलंब लागतो. विवाह दोन होण्याची दाट शक्यता असते. संतती होते व मृत होते. एकंदर संतती दोन- तीन राहतात. ऐहिक सुख भरपूर होते. प्रसिद्धीस येतात. निदान आपल्या सर्कलमध्ये तरी पुढे येतात. 

स्वभाव अतिशय विक्षिप्त, आत एक बाहेर एक आपला स्वार्थ साधून मग इतरांवर उपकार करणारे, कोणावरही विश्वास न टाकणारे, सर्व विश्व आपल्या विरुद्ध आहे असा भास यांना होत असतो.वार्धक्यात बायको मुले विरुद्ध होतात. षष्ठस्थानी आयुष्यभर विरोध सहन करावा लागतो. परंतु कोणीही समोर टिकत नाही.नाना तऱ्हेचे रोग होतात. विशेषतः सर्दी,संधिवात वगॆरे होतात. ऐन वयात स्त्री जाते. अधिकार, पैसा,मानमरातब फार मिळतो. वृद्धापकाळात शारीरिक कष्ट फार होतात. घरात कोणतीतरी रक पीडा चालू असते.

सप्तमस्थानी- आर्थिकदृष्ट्या व धंद्याच्या दृष्टिने फार भाग्योदयकारक काल जातो. दोन विवाह करण्याकडे प्रवृत्ती.आणि जर बायको एकच राहिली आणि तिलाच संतती झाली, तर द्रव्यदृष्ट्या भाग्योदय नष्ट होतो. व्यवसाय मोठं- मोठे कल्पनेबाहेर होतात व आपला भाग्योदय पूर्ण झाला असे वाटते. तो पुन्हा खाली येतो व पुन्हा वर चढतो, असे आयुष्यभर चालू असते. नवरा- बायको न भांडता संसार करतात, पण वृद्धापकाळात बायकोच्या कब्जात जावे लागते.मुले विरुद्ध होतात व शेवटी दारिद्री- योग  येतो, पण पूर्ववयात राजयोग, तर उतारवयात दारिद्रय असे जवळ-जवळ पाच- सहा पिढ्यापर्यंत चालते.

अष्टमस्थान– स्वकष्टार्जीत कमाई करून वर यावे लागते. पैसा खूप मिळवितात व स्वतःच्या चुकीने घालवतात. वयाच्या उत्तरार्धात दारिद्र्य येते.यांचा मृत्यू यांना कळून चुकतो. दीर्घायु असतात. ही युती फक्त कर्क, सिंह या राशीत चांगली फळे देते. बाकीच्या राशीत साधारण फळे देते.

नवमस्थान हा वडील असतो अथवा धाकटा असतो.अथवा बापाला एकटाच असतो. शिक्षण पूर्ण होते.,कितीही विवाह करून घेतले, तरी मनासारखे होत नाही. याना बाहेरचे प्रेम पाहिजे आपल्यापेक्षा वयाने मोठी पाहिजे. मेष,सिंह,धनू, कर्क, वृश्चिक, मीन व मिथुन राशीत शिक्षणाकरता परदेशगमन करावे लागते. भाग्योदय वयाच्या 33 पासून सुरू होऊन 49 ला परिसीमा होते (क्रमशः) भाग-१३२

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक


संपर्क- 9096587586