सर्वात वर

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कुणीतरी येणार गं…!

मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

मुंबई – स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘रंग माझा वेगळा’ (Rang Mazha Vegla)या लोकप्रिय मालिकेत लवकरच रसिकांनी अनेक कडू गोड आठवणी पहिल्या दीपाच्या लग्ना पासून कार्तिकच्या जिद्धीने दीपाशी झालेल्या लग्ना पर्यंत आता येणाऱ्या भागात दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. दीपाला लहानपणा पासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे दीपाने  राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि दीपाचा सर्वस्व झाला.

अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे. मात्र आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे. त्यामुळे डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे.


डोहाळ जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात मात्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिरवी साडी आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये दीपाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. तेव्हा रंग माझा वेगळा मालिकेतलं (Rang Mazha Vegla) हे नवं वळण रसिकांना पहायला मिळणार आहे सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर. (Star Pravah)