सर्वात वर

‘पी बी ए म्युझिकचे’ “विठ्ठला विठ्ठला” गाणं झाले प्रदर्शित

मुंबई – तेजस भालेराव द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित गीत ” विठ्ठला विठ्ठला ” ‘आषाढी एकादशीच्या मूहूर्तावर पी बी ए म्युसिकने प्रदर्शित केले आहे. पुणे फिल्म सिटी द्वारा प्रदर्शित हे गाणं नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ह्या गाण्याला राम बावनकुले ह्यांनी गायले असून अक्षय जोशी ह्यांनी गाणी लिहिले आणि संगीत दिले आहे. 

मराठी गाणं ” विठ्ठला विठ्ठला ” हे आजच्या तरूणांसाठी  गाणं आहे. मोहक गीत आणि उत्कृष्ठ नृत्य दिग्दर्शनामुळे हे गाणं रसिकानाच्या पसंतीला उतरले आहे. अभिनेता रोहन माने ह्यांनी स्वतः रोहन माने यांनी हे गाणे नृत्यदिग्दर्शन केले आहे, ह्या गाण्यामध्ये रोहन माने, तेजस्विनी वाघ यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. अभिनेता रोहन माने म्हणाले, ” मी जेव्हा हे गाणं ऐकले तेव्हा मी खूप आनंदित  झालो कारण खरोखरच हे गाणे अतिशय लक्षवेधी आहे. मी स्वत: नृत्यदिग्दर्शक असल्याने या गाण्याचे  नृत्यदिग्दर्शन  करायचं ठरवलं आणि तेजस्विनी वाघ यांच्यासह हे गाण्याचे शूटिंग करायला खूप मजा आली. तेजस सर आणि वैभव लोंढे चित्रीकरणाच्या  वेळी इतके समर्थक साथ मिळाल्याने आम्ही खरोखरच एक उत्तम बॉण्ड बनविला आहे, मला विश्वास आहे की प्रेक्षकांना हे गाणे आतापर्यंत खूप आवडेल त्याचबरोबर   हे माझे वैयक्तिक आवडते गाणे आहे. ”  

राम बावनकुळे यांनी गायलेले “विठ्ठला विठ्ठला” हे गाणे पीबीए म्युझिकच्या बॅनरखाली अक्षय जोशी यांनी लिहिले आहे. आणि लवकरच असेच उत्तम गीत ‘पीबीए म्युझिक’ प्रदर्शित करणार आहे.