सर्वात वर

शेअर बाजार दिवसभर अस्थिर

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

भारतीय शेअर बाजारात आज एक जबरदस्त VOLATILE सत्र बघायला मिळाले त्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी ग्रुप कंपनीतच्या  सर्व  समभागांमध्ये एकतर्फी विक्री बघायला मिळाली ,कारण एन एस डी एल ह्या संस्थेने तीन फॉरेन फडांचे  त्यांनी खरेदी केलेले या ग्रुपचे समभाग फ्रिज केल्याची बातमी बाजारात पसरली त्याच बरोबर अदानी  ग्रुप ऑफ कंपनीज चे सर्व सहभाग ट्रेड टू ट्रेड मध्ये स्विफ्ट करण्यात आले ,यामध्ये गुंतवणूक दाराने जर समभाग खरेदी करायचे असतील तर त्याला 100% पैसे द्यावे लागतात आणि समभाग घ्यावे लागतात ,त्याच बरोबर त्याने विक्री केले तर त्याला समभाग मार्केटमध्ये द्यावे लागतात आणि ह्या सेगमेंट मध्ये गुंतवणूकदार इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही आज घेतलेला स्टॉक त्याला दोन दिवसानंतर त्यांच्या डिमॅट अकाउंट मध्ये येतो आणि त्यानंतरच वतनदार त्याची विक्री करू शकतो.

या सर्वांचा परिणाम ग्रुप ऑफ कंपनीज च्या समभागांवर दिसला त्यामुळे सन सेक्स जवळपास 500 अंकांनी आणि मी 125 पेक्षा जास्त खाली पडला होता परंतु दुपारच्या सत्रानंतर अदानी ग्रुप ऑफ कंपनीज चे रजिस्ट्रार यांनी सविस्तर माहिती दिल्यानंतर काही प्रमाणात त्या समभागांना दिलासा मिळाला पण दुसरीकडे बाजाराला खऱ्या अर्थाने सकारात्मक बंद करण्यामध्ये रिलायन्स बजाज डिविज लॅब , विप्रो , पी एस यु बँकांच्या समभागांमध्ये खरेदी आल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक  सेन्सेक्स 76 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 52 551 या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 12 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 15 812 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी निर्देशांक 97 अंकांनी घसरून 34 950 या पातळीवर स्थिरावला.

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर तब्बल 1624 समभाग सकारात्मक होते आणि 1625  समभाग नकारात्मक होते 125 समभागांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसला नाही.डॉलरच्या मोबदल्यात रुपया हलक्या स्वरूपात खाली होता. लातूर बाजारांमध्ये सोने आणि चांदी जरी स्थिर आणि काही प्रमाणात चढ-उतार असले तरीपण क्रूड ऑइल मध्ये मागील काही दिवसापासून वाढ दिसत आहे.

बाजारातील जाणकार सांगत आहेत की सोशल मीडियावर सर्वच बातम्या ह्या खरे असतात असे नाही कारण मागील काही दिवसांपासून बाजाराविषयी सकारात्मक तसेच नकारात्मक सुद्धा बातम्या पसरवल्या जात आहेत गुंतवणूकदारांनी या बातम्यांच्या द्वारे विचलित न होता बाजार वर गेला तर आपल्या खात्यात नफा घेऊन घ्यावा आणि बाजार खाली आला तर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक सल्लागार यांच्यामार्फत खरेदी करत राहावी, बाजारामध्ये अजून सुद्धा बऱ्याच अशा कॉलिटी कंपनीज मिट कॅप स्टॉक आहेत की जे शेअर होल्डर्स ला लाभांश देतात त्यांचा तिमाही व वार्षिक नफा सुद्धा चांगला असतो ह्या कंपन्या कॅश संपन्न  आहेतच आणि आपले समभाग घालून सुद्धा ठेवलेले नाही अशा कंपन्यांमध्ये जर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली तर लंबे अवधीमध्ये त्यांना चांगला परतावा मिळू शकतो.

NIFTY १५८१२ + १२

SENSEX ५२५५१ + ७६

BANK NIFTY ३४९५० – ९७  

आज निफ्टी वधारलेला शेअर्स  

DIVIS LAB ४३९८ + २%

TATA MOTORS ३५६ + २%

RELIANCE २२४५ + २%

WIPRO ५६२ + २%

BAJFINANCE ६१९९ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ADANIPORTS ७६२ – ९%

COAL INDIA १५९ – २%

KOTAK BANK १७६७ – १%

HDFC २५४० – १%

NTPC ११८ – १%

यु एस डी आय  एन आर $ ७३.३५२५

सोने १० ग्रॅम       ४८११२.००

चांदी १ किलो      ७१३३०.००

क्रूड ऑईल          ५२२८.००

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

संपर्क -8888280555