सर्वात वर

शेअर बाजार २५४ अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे,नाशिक

सध्या भारतीय शेअर (Stock Market) बाजारात जागतिक स्तरावरील संकेतांच्या आधारे जबरदस्त INTRADAY चढ उतार बघायला मिळत आहेत. आज सकाळी सुद्धा अमेरिकेतील राजकीय, आर्थिक व प्रोत्साहन पॅकेज ह्या सर्व  घडामोडींच्या आधारे व त्याचाच धागा पकडत सिंगापूर निफ्टी  सुद्धा  सकाळी 100 अंकांनी वधारलेले दिसले,त्याचाच परीणाम सकाळी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक  SENSEX 374 अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक NIFTY 109 सकारात्मक उघडले, ही तेजी काही काळ कायम सुद्धा राहिली परंतु उद्या महाशिवरात्री निमित्ताने सुट्टी असल्याने बाजार बंद राहणार आहेत त्यामुळे आज गुरुवार ऐवजी आज  WEEKLY EXPIRY होती, ह्यामुळे बाजारात खूप मोठ्या  प्रमाणात चढ उतार दिसले परंतु बाजार बंद झाला  तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा  (Stock Market) तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 254 अंकांनी वधारून 51279 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास संमभागांचानिर्देशांक NIFTY सुद्धा 76 अंकांनी वधारून 15175 ह्या पातळीवर बंद झाला तर NIFTY BANK सुद्धा 72 अंकांनी वधारून 35938 ह्या पातळीवर बंद झाला.

अमेरिकेत साध्य बायडेन सरकार प्रोत्साहन पॅकेज किती देणार यावर सर्व जगाचे लक्ष लागले आहे त्याच बरोबर भारतात केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण प्रोसेस व इतर महत्त्वाचा विषयाकडे लक्ष लागले आहे त्यामुळे साध्य भारतीय शेअर बाजारात (Stock Market)मोठे चढ उतार दिसत असले तरी दुसरी कडे करोना लस व नव्याने डोके काढत असलेला करोना ह्यामुळे बाजारात स्थिती स्पस्ट होत नसतांना दिसत आहे परंतु बाजारात रोज वेगवेगळ्या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी बघायला मिळत असली तरी एकीकडे विदेशी वित्तीय संस्था खरेदी दर्शवत आहेत तर स्थानिक वित्तीय संस्था विक्री करून नफा वसुली करत आहेत. 

बाजारातील जाणकार सांगत आहेत की, बाजार साध्य उंच स्तरावर आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत असतांना बाय ऑन डीप हे तंत्र तर अवलंवावेच त्याच बरोबर चांगल्या परतीच्या  शेअर्समध्ये (Stock Market) आपली गुंतवणूक ठेवली पाहिजे. 

NIFTY १५१७५ + ७६

SENSEX ५१२७९ + २५४

BANK NIFTY ३५९३८ + ७२

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

EICHERMOT २६७३ + ३%

JSWSTEEL ४१४ + ३%

HINDALCO ३४१ + २%

TATASTEEL ७२३ + २%

BAJFINANCE ५५३८ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

SBI LIFE ९३८ – ४%

ONGC ११५ – २%

IOC ९९ – २%

HDFC LIFE ७२९ – २%

KOTAK BANK १९६१ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.१०५०

सोने १० ग्रॅम             ४४७४०.००

चांदी १ किलो           ६७१३५.००

क्रूड ऑईल                ४६९२.००

विश्वनाथ बोदडे,नाशिक

संपर्क- 8888280555