सर्वात वर

… तर महाराष्ट्रात पूर्ण लॉक डाउन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

 येत्या २ ते ३ दिवसात निर्णय घेणार 

मुंबई – महाराष्ट्र कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. येत्या एक दोन दिवसात तज्ज्ञ ,राजकीय पक्ष आणि पत्रकारांशी चर्चा करून मी निर्णय जाहीर करेल आणि जर तरीही परिस्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्रात पूर्ण लॉक डाउन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधतांना दिला आहे.

येत्या दोन दिवसात दृश्य स्वरुपात सुधारणा झाल्याचं दिसलं नाही तर नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी जिद्द ठेवायला हवी. मी येत्या दोन दिवसात आणखी काही जणांशी बोलणार.परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझील सारखा सुकसुकाट होईल,  लॉकडाऊन व्यतिरिक्त इतर काय पर्याय असेल यावर तज्ज्ञांशी बोलून ठरविण्यात येईल. सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करीत आहे की, यात राजकारण करू नका. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे.

रुग्ण वाढ कमी करण्यासाठी अद्याप कोणताही पर्याय नाही. कोरोनाच्या काळात राजकारण करू नका असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. जिथेजिथे अनावश्यक गर्दी होत असेल ती गर्दी टाळावीच लागेल येत्या काही दिवसात चर्चा करून कडक निर्बंध लावणार मला व्हिलन ठरवले तरी चालेल पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत राहणार असे हि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले. 

येत्या काही दिवसात महाराष्ट्रात दररोज २ लाख ५० हजार चाचण्या करणार 

सध्या महाराष्ट्र ५०० पेक्षा जास्त लॅब आहेत. 

महाराष्ट्र देशात लसीकरणामध्ये अव्वल ठरला आहे. काल एका दिवसात आपण ३ लाख लोकांना लस दिले गेल्या आहेत.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले