सर्वात वर

लसीकरणासाठी वयाचे बंधन नसावे – राज ठाकरे

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झाल्येल्या झूम मीटिंग चा तपशील प्रसारमाध्यमांना दिला. पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले “काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावेळी सांगितलं.

‘महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये करोना रुग्ण संख्या मोजली जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,’ कोरोनाच्या लसीकरणासाठी वयाची मर्यादा ठेऊ नये असं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले 


राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सूचना दिल्या 


 * शाळा जरी वर्षभर बंद असल्या तरी शाळाच्या फी तशाच आहे. त्या घेऊ नका किंवा ५० टक्के घ्या.   

* राज्यात अनेक हॉस्पिटल मध्ये बेड शिल्लक आहे बेड असून पण हॉस्पिटल सर्वसामन्य लोकांना बेड मिळत नाही या हॉस्पिटल विषयी कारवाई करावी . 

* लसीकरणासाठी वयाचे बंधन नसावे आणि लसीकरण वाढवावे  

* बँकांना सूचना देऊन सक्तीची वसुली थांबवावी 
* वीजबिल माफ करून लोकांना दिलासा द्या 
* कंत्राटी कामगारांना परत बोलवा आणि महापालिका किंवा तत्सम ठिकाणी यांना कायमस्वरूपी

 * सलून आणि मनोरंजन क्षेत्राला आठवड्यातून २ दिवस परवानगी द्या 
* खेळाडूंना सराव करण्यासाठी परवानगी द्यावी 
* शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा 
* १० वी १२ च्या मुलांना प्रमोट करा 
* अनिल देशमुख हा महत्वाचा विषय नाही पण मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटकाने भरलेली गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली याची चौकशी झाली पाहिजे. मूळ प्रकरणा पासून तपास भरकटायला नको. 
* उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय..! की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय असा विनोद राज ठाकरेंना (Raj Thackeray) आला होता असे ही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले