सर्वात वर

बाबाज् करंडक स्पर्धेत टिटवाळ्याची ‘ स्टार ‘ एकांकिका सर्वप्रथम

धर्मवीर सुनील बागुल यांच्या वाढदिवसा निमित्त बाबाज थिएटर तर्फे सत्कार 

नाशिक ( Nashik News) – बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकांकिका स्पर्धेचे यंदा २१ वे वर्ष आहे. अतिशय उत्साहात चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत टिटवाळा येथील जिराफ थिएटर्सच्या ‘ स्टार ‘ या एकांकिकेला २० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व करंडक देण्यात आला. द्वितीय १५ हजारांचे पारितोषिक कोल्हापूरच्या परिवर्तन कला फाउंडेशन निर्मित ‘ जंगल जंगल बटा चला है ‘ या तर तृतीय १० हजार रुपयांचे पारितोषिक डोंबिवलीच्या स्वामी नाट्यांंशन निर्मित ‘ नवरा आला वेशीपाशी ‘ या एकांकिकांंना  देण्यात आले. यावेळी एकूण ८५ हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रमुख पाहुणे व ९४ व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर व लोकनेते सुनील बागूल, उपमहापौर भिकुबाई बागूल यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या पारितोषिक वितरण समारंभात व्यासपीठावर युवानेते मनीष बागूल, प्रीतम बागूल, धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर बागूल व मान्यवर उपस्थित होते. बाबाज् थिएटर्सचे संस्थापक, अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. ते म्हणाले, यापुढे दरवर्षी दि.७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान लोकोत्सव सांस्कृतिक सोहळा आयोजित केला जाईल. यंदा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसाठी एकूण ७३ प्रवेशिका दाखल झाल्या. मात्र अडीच दिवसांच्या मर्यादेत त्यातील ३४ एकांकिका सादर करण्याची संधी देण्यात आली.

धर्मवीर  सुनिलभाऊ  बागुल  यांचा  सत्कार  करताना  प्रशांत  जुन्नरे.

पुढील वर्षापासून बाबाज् करंडक स्पर्धा ५ दिवस घेण्यात येईल. त्यामुळे जास्त स्पर्धकांना सहभागी होता येईल असे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले. उत्तर महाराष्ट्रात समग्र गुरुकुल व कलाअकादमी लवकरच स्थापन करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. जयप्रकाश जातेगावकर म्हणाले, कोरोनामुळे सांस्कृतिक व नाट्यक्षेत्रावर आलेली मरगळ लोकोत्सवाने दूर केली आहे. पुढील वर्षी सार्वजनिक वाचनालयातर्फे जुन्नरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही त्यांनी नमूद केले. सुनील बागूल यांनी गुरुकुल व कलाअकादमी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली.

स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद तेंब्रे, संध्या धोपावकर, अंशू सिंग यांनी पार पाडली.प्रमुख  पाहुणे.उपमहापौर  भिकूबाई  बागुल, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर ,शंभूराजे  बागुल,बंटी  बागुल, नारायण  गायकवाड, किसन  बल्लाळ, आदी उपस्थित होते. 

परीक्षकांचे विशेष पारितोषिक नाशिकच्या रुद्राक्षम थिएटर निर्मित ‘ फिल्मसिटी ‘ एकांकिकेने पटकावले. वैयक्तिक स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष – प्रथम – वैभव ओगले (आकांत), द्वितीय – केदार देसाई ( तुकडबग्गा ), तृतीय – अनिल आव्हाड ( स्टार) उत्तेजनार्थ – स्वप्नील दळवी ( नवरा आला…), प्रणव सपकाळे (कलंडलेले पेले ), सूरज बोढाई (नॉट…) सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री – प्रथम – अनामिका डांगरे, द्वितीय -अक्षता शब्दे ( स्टार), तृतीय -मिथिला पाटील ( नवरा आला…), उत्तेजनार्थ – करिष्मा वाघ ( द डे),गायत्री नाईक ( घरोट), अलका बोटे ( टेक ऑफ) , वाचिक अभिनय – आकाशरेखा थिटे ( मिठी मारतांना ), मानसी वाकडे (रात्रीस खेळ चाले ), दिग्दर्शन – प्रथम – करणसिंह चव्हाण ( जंगल…), बॉबी ( स्टार ) तृतीय – यश नवले ( नवरा आला…) विनोदी अभिनेता – बळीराम शिंदे (भोकरवाडीचा शड्डू) नेपथ्य – प्रथम हेमंत वनगे/ अमोल जाधव ( घरोट ), द्वितीय – आकाश पांडे / मनीषा प्रजापती, तृतीय – प्रदीप भोई ( भ भुत्या ) प्रकाशयोजना – प्रथम अनुप बहाळ ( उत्खनन ) साई शिर्सेकर ( स्टार ) पार्श्वसंगीत – रोहित सरोदे ( फिल्मसिटी ), द्वितीय – ऐश्वर्या बारवाल ( स्टार), तृतीय – ओंकार वरणे ( जंगल..) यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रवीण कांबळे व सहकाऱ्यांनी एकांकिका स्पर्धेचे संपूर्णपणे नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद जोशी यांनी केले.

 दि.१३ पर्यंत चाललेल्या या लोकोत्सव सोहळ्यात कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर बागुल,राजेश पिंगळे, स्पर्धा प्रमुख प्रवीण कांबळे,नारायण गायकवाड, सचिन दप्तरी, विजय निकम, किसन बल्लाळ, अमोल पाळेकर, प्रा. प्रीतिश कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, जगदीश जंगम, विजय राजेभोसले, विकास बल्लाळ, कैलास पाटील आदी कार्यकर्ते सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते.(Nashik News)