सर्वात वर

आज नाशिक शहरात १०१ तर ग्रामीण मध्ये ५२ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात २०० कोरोना मुक्त तर ५२२ संशयित दाखल  : २ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.२८ %

नाशिक (प्रतिनिधी)आज दिवसभरात शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली असली तरी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे. आज शहरात  कोरोनाचे १०१ नवे रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात कोरोनाचे ५२ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२८ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९५ .७१ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात २०० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ५२२ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २८०७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १८३३ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १०१,मालेगाव मध्ये ७,नाशिक ग्रामीण ४४ ,जिल्ह्या बाह्य ०१ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.६६,टक्के, नाशिक शहरात ९५.७१ टक्के, मालेगाव मध्ये  ९२.९४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.०८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५०  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १०१ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ६२९  क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६३,१७८ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६०,४७० जण कोरोना मुक्त झाले असून १८३३ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 
१) फ्लॅट क्र१, हरी कुंभ सोसायटी,रामदास स्वामी नगर,नाशिक येथील ८३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०२

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७०१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८७५

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -५०३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १४

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६२६

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-8-NOV-2020.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली