सर्वात वर

आज नाशिक शहरात १३५ तर ग्रामीण मध्ये १०५ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात २१८ कोरोना मुक्त तर ६४२ संशयित दाखल  : ६ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.२९ %

नाशिक (प्रतिनिधी)आज शहरात  कोरोनाचे १३५ नवे रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात कोरोनाचे १०५ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२९ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९५ .८३ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात २१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ६४२ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २८०१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १७६२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १३५,मालेगाव मध्ये ५,नाशिक ग्रामीण ९१ ,जिल्ह्या बाह्य ०९ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.३८,टक्के, नाशिक शहरात ९५.८३ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.३५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.०८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२९  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १३५ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५९१ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६३,३१३ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६०,६७५ जण कोरोना मुक्त झाले असून १७६२ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) रो हाऊस क्र.२, हस्तकला सोसायटी, गोकुळ नगर , जेलरोड,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७०७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८७६

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -५४६

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ८१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ५६७

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या  (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली