सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२० नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस, घबाड सकाळी ९.२२ ते रात्री ९.३० ” 
चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा (सकाळी सकाळी ९.२२ पर्यंत)  
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उपासना केल्यास सिद्धी प्राप्त होतील. गुरू सान्निध्य लाभेल. उत्तम दिवस आहे.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सरकारी कामात व्यत्यय येईल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याची चिंता सतावेल. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. प्रतिष्ठा संभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक घडी उत्तम बसेल. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामात अडथळे येतील. मन स्थिर राहणार नाही. महत्वाचे निर्णय आज नकोत. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सात्विक आनंद देणारा दिवस आहे. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात टाकणारा दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. कोणालाही जामीन राहू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामात चूक होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली