सर्वात वर

शेअर बाजारात तेजी परतली

विश्वनाथ बोदडे,नाशिक

जागतिक शेअर बाजाराचे सकारात्मक संकेत त्याच्याच आधारावर आज सकाळी भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकारात्मक उघडला ,दिवसभर जरी बाजार नियमित कक्षेत राहिला असला तरी शुक्रवारी एका स्थिर अवस्थेत असलेला आणि नकारात्मक बंद झालेला बाजार आज सकारात्मक बंद होण्यात यशस्वी ठरला त्याचे मुख्य कारण म्हणजे काही सिलेक्टिव्ह सेक्टर च्या समभागांमध्ये दिसलेली मागणी होईल आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा  (Todays Stock Market) तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 228 अंकांनी वधारून 52328 या पातळीवर लावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY  सुद्धा 81 अंकांनी वधारून 15 751 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक 152 अंकांनी वधारून 35 443 या पातळीवर बंद झाला.

काही राज्यातील लॉक डाऊन च्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे बाजारामध्ये भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये लॉक डाऊन मध्ये मागणी नव्हती परंतु लॉक डाउन ओपन झाल्यानंतर किंवा शिथीलता दिल्यानंतर मागणी वाढेल या आशेने ठराविक क्षेत्रांच्या समभागांमध्ये आज बाजारामध्ये मागणी दिसली त्याच बरोबर करोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे आणि मार्केट बंद झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलेल्या भाषणामध्ये लसीकरण कशा प्रकारे होईल आणि राज्य सरकारांना रसिक कशा मोफत दिल्या जातील त्याच बरोबर इतर देशांच्या तुलनेने मध्ये आपला देश कसा आघाडीवर आहे याची तुलनात्मक चर्चा करून पुढे आपण येणाऱ्या संकटां वर कशाप्रकारे मात करू शकतो अशी शास्वती  दिली आहे त्यामुळे या गोष्टीला सुद्धा शेअर बाजार सकारात्मक घेईल.

डॉलरच्या मोबदल्यात आज रुपया मजबूत दिसला त्याच बरोबर धातु बाजारांमध्ये सोने आणि चांदी यामध्ये काही प्रमाणात मागणी होती परंतु इंधनाचे भाव वाढण्यास कारणीभूत असणारा द्रव्य म्हणजे क्रूड ऑइल यांचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण याचे परिणाम विविध क्षेत्रांवर उमटत असतात.बाजाराचे जाणकार सांगत आहेत ती जर पुढील काळामध्ये रुग्ण संख्या वाढली नाही आणि लसीकरण योग्य पद्धतीने देशभरात झाले तर भारतीय शेअर बाजारांमध्ये (Todays Stock Market) विदेशी वित्तीय संस्थांकडून चांगल्या प्रकारे गुंतवणूक येऊ शकते त्याच बरोबर रिटेल गुंतवणूक दारांचे प्रमाण सुद्धा वाळू शकते. (Todays Stock Market)  

NIFTY १५७५१ + ८१

SENSEX ५२३२८ + २२८ 

BANK NIFTY ३५४४३ + १५२  

(Todays Stock Market) आज निफ्टी वधारलेला शेअर्स 


ADANIPORTS ८७८ + ५%

POWERGRID २३७ + ५%

NTPC ११६ + ४%

TATA MOTORS ३४४ + ३%

ULTRACEMCO ६८३६ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

BAJFINANCE ५७२६ – ५%

BAJAFINSV ११७९८ – ३%

HDFC २५८७ – १%

DIVS LAB ४२२७ – १%

CIPLA ९३९ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७२.९९००

सोने १० ग्रॅम         ४८७००.००

चांदी १ किलो       ७११२५.००

क्रूड ऑईल           ५०६०.००

संपर्क – 8888280555