सर्वात वर

शेअर बाजार ३३३ अंकांनी घसरला

विश्वनाथ बोदडे, नाशिक

शेअर बाजाराच्या आजच्या (Todays Stock Market ) सत्राला नफा वसुलीचे सत्र बघायला मिळाले.  कारण सकाळी बाजार हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडला परंतु हळू हळू बाजारामध्ये स्तरावर विक्री बघायला मिळत होती त्यामुळे काल आणि आज आज बाजारामध्ये (Todays Stock Market ) नफा वसुली बघायला मिळाली आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 333 अंकांनी घसरून 51 941 या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 सर्व भागांचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी घसरून 15 635 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर म्हणून तयार झालेला निफ्टी निर्देशांक 285 अंकांनी घसरून 34 आठशे या पातळीवर स्थिरावला.

बाजारामध्ये आज दुपारच्या सत्रामध्ये रिलायन्स टाटा मोटर, अडाणी पोर्ट आणि बँकिंग आणि फायनान्स त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या मिडकॅप स्टॉक  मध्ये सुद्धा विक्री बघायला मिळाली.आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख शेअर बाजार सुद्धा नकारात्मक दिसत आहे आता हे बघायचे आहे की पॅड इंटरेस्ट रेट वाढवणार की नाही कारण जर का वधारले तर त्याचा महागाईवर परिणाम होतो त्यामुळे जागतिक स्तरावरील बाजारामध्ये आज रात्री काय होते त्यावर त्याचे मार्केट अवलंबून राहील परंतु दुसरी बाजू बघितली तर स्थानिक वित्तीय संस्थांकडून बाजारामध्ये खरेदी होताना दिसत आहे.

बाजाराची जाणकार सांगत आहेत की पुढील बाजाराची दशा आणि दिशा हे सरकारकडून कोणते सकारात्मक पाऊल उचलले जाते त्याच बरोबर मान्सूनची परिस्थिती काय राहील आणि विदेशी वित्तीय संस्था स्थानिक वित्तीय संस्था रिटेल इन्वेस्टर यांचे पार्टिसिपेशन कसे  राहील,  यावर बाजार आपली दिशा ठरवेल ,त्यामुळे गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफा बुक करत राहावा आणि खालच्या स्तरावर टप्प्याटप्प्याने खरेदी करत राहणे योग्य ठरेल.

डॉलरच्या मुकाबल्यात रुपयाच्या किमती मध्ये  तितकासा बदल दिसला नाही ,त्याचबरोबर धातु बाजारांमध्ये सोने , चांदी यांच्या किमती स्थिर होत्याक्रूड ऑइल च्या किमती काही दिवसापासून सातत्याने वाढत असताना दिसत आहेत.

NIFTY १५६३५ – १०५

SENSEX ५१९४१ – ३३३

BANK NIFTY ३४८०० – २८५  

(Todays Stock Market ) आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

POWERGRID २४३ + ४%

SBI LIFE ९९७ + २%. 

NTPC ११८ + २%

TITAN १७२६ + १%

COAL INDIA १५७ + १%

(Todays Stock Market )आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATA MOTOR ३४३ – ३%

ADANIPORTS ८५३ – ३%

SHREECEM २८३७१ – २%

LT १५२० – २%

RELIANCE २१७८ – २%

यु एस डी  आय एन आर $ ७३.०९२५

सोने १० ग्रॅम          ४८८५५.००

चांदी १ किलो        ७१२३०.००

क्रूड ऑईल            ५१२३.००

विश्वनाथ बोदडे, नाशिक

  संपर्क-8888280555