सर्वात वर

आंतरराष्ट्रीय दबाव : SENSEX 263 अंकांनी घसरला

विश्वनाथ बोदडे,नाशिक

ग्लोबल मार्केटमधील संकेतांच्या आधारे आज भारतीय शेअर बाजारात नफा वसुली बघायला मिळली पण शेवटच्या सत्रात काही प्रमाणात RECOVERY बघायला मिळली त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा  निर्देशांक SENSEX 263 अंकांनी घसरून 48174 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 53 अंकांनी घसरून 14146 ह्या पातळीवर बंद झाला परंतु NIFTY BANK 75 अंकांनी सकारात्मक बंद झाला.

आज सकाळपासूनच बाजारात दबाव दिसत होता , कारण ग्लोबल मार्केट सुद्धा नकारात्मक होते सकाळी सिंगापूर निफ्टी, अमेरिकन बाजार सुद्धा नकारात्मक होते त्याचाच परीणाम म्हणून सकाळी SENSEX 107 अंकांनी आणि आणि NIFTY 29 अंकांनी नकारात्मक उघडले होते पण ही नकारात्मकता एवढी वाढली होती की, SENSEX 500 अंकांनी खाली घसरला होता पण दुपारच्या सत्रात BUYING दिसली पण IT आणि FMCG शेअर्समध्ये नफा  वसुली दिसली.

यापुढे सुद्धा बाजारात VOLATILITY दिसेल असे बाजाराचे जाणकार सांगत आहेत, कारण बाजारात FII चा गुंतवणूक FLOW। सातत्याने  सुरू असल्याने बाजारात तेजी आहे जर ग्लोबल मार्केटमध्ये नफा वसुली दिसली तर भारतीय बाजारात त्याचे पडसाद दिसू शकतील त्याच बरोबर 1 फेब्रुवारी ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याचे सुद्धा परिणाम बाजारात दिसतील. 

NIFTY 14146 -53

SENSEX  48174 – 263 

NIFTYBANK 31,797 +75

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

POWER GRID 195 +4.14%

GAIL 133.90 +3.56%

HINDALCO 259 + 3.56%

SHREE CEM 24699 +3.36%

BHARATIAIRT 528 +2.76%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ITC 205  – 2.91 

RELIANCE 1915  – 2.57%

AXIS BANK 651 – 1.94%

BAJAJ FINSERV – 1.92%

HCL TECH 976 – 1.55% 

USD INR $ 73.08

सोने १० ग्रॅम          51,559.00

चांदी १ किलो        70,848.00

क्रूड ऑईल             3659.00

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

Mobile – 8888280555