सर्वात वर

शेअर बाजारातील तेजीला ब्रेक : आज दिवसभर बाजार अस्थिर

विश्वनाथ बोदडे,नाशिक

भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) आज एक संथ ,संमिश्र व VOLATILE  सत्र बघायला मिळाले,जागतिक स्तरावरील सर्वच शेअर बाजार संमिश्र असे बंद झाले होते, त्याचाच परिणाम म्हणून सकाळी मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock Market) निर्देशांक नाकारात्मक उघडला परंतु दिवसभर बाजार एकदम संथ राहिला,कारण बाजारामध्ये ठराविक क्षेत्रांच्या समभगांमधे हलकीशी खरेदी बघायला मिळाली.  

परंतु वरच्या स्तरावर आपल्याला विक्री सुद्धा बघायला मिळत होती ,त्यामुळेच बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी  हे दोघेही हलक्या स्वरूपामध्ये नकारात्मक बंद झाले त्याच बरोबर काही प्रमाणात PSU बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी  दिसत होती, त्यामुळे बँक निफ्टी हा निर्देशांक 36 अंकांनी वधारून 35 373 या पातळीवर बंद झाला.

बाजारामध्ये सध्या वरच्या स्तरावर नफा वसुली बघायला मिळत आहे बाजारामध्ये जे नवीन मार्जिन नियम लावण्यात आलेले आहे त्यांचासुद्धा परिणाम सध्या दिसत आहे परंतु गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक चांगल्या प्रतीच्या आणि विविध क्षेत्रांच्या  समभागांमध्ये बाय या तंत्राचा अवलंब करून सातत्यपूर्ण गुंतवणूक करत राहणे योग्य राहील.

बाजारातील जाणकार सांगत आहेत की ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला व जनतेला मदत व्हावी म्हणून काही प्रोत्साहनपर पॅकेज प्रपोज करण्यात आलेले आहेत त्याच प्रमाणे भारतात सुद्धा करण्यात येऊ शकतात हानी सरकारी कंपन्यांची विक्रीची प्रोसेस संथ झाली होती. त्याला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे बाजार खाली आला तरी सुद्धा गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण आणि आपल्याला जेवढे शक्य आहे त्याप्रमाणात  करत राहणे उचीत ठरेल.

NIFTY १५५७६ + १

SENSEX ५१८४९ – ८५

BANK NIFTY ३५३७३ + ३६

(Todays Stock Market)आज निफ्टी वधारलेला शेअर्स  

UPL ८३८ + ३%

TATA STEEL ११२८ + ३%

HINDALCO ४०२ + २%

JSW STEEL ७०७ + २%

RELIANCE २२०७ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ITC २०९ – ३%

TECHM १०१८ – १%

AXIS BANK ७३७ – १%

ASIANPAINT २९०६ – १%

HDFC २५६२ – १%

यु एस डीआय एन आर $ ७३.३९७५

सोने १० ग्रॅम         ४८९९९.००

चांदी १ किलो        ७१९००.००

क्रूड ऑईल            ५००५.००

विश्वनाथ बोदडे,नाशिक

  संपर्क-8888280555