सर्वात वर

शेअर बाजारावर LOCKDOWN चे टेन्शन : शेअराची स्थिती वाचा सविस्तर

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

करोनाची वाढती रुग्ण संख्या , LOCKDOWN चे टेन्शन आणि जागतिक स्तरावरील परिस्थिती ,या सर्व घटनांच्या आधारे भारतीय शेअर बाजारात  (Todays Stock Market ) चांगलेच चढ उतार बघायला मिळत आहेत.

सोमवारी बाजारात (Todays Stock Market ) मोठ्या प्रमाणात घसरण दिसली तीच घसरण मंगळवारी आणि बुधवारी आलेल्या RBI POLICY मुळे सावरली आणि आज बाजारात FUTURE आणि OPTION ची WEEKLY EXPIRY होती त्यामुळे बाजार VOLATILE राहिला पण बाजारात खरे टेन्शन आहे ते देशभरात व प्रामुख्याने महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोविड रुग्ण संख्येनमुळे परंतु बाजाराला METAL आणि IT क्षेत्र सावरण्याचे काम करत आहे. LOCKDOWN मुळे निश्चितच प्राथमिक नकारात्मक परिणाम दिसतात त्यात बाजार उंच स्तरावर आहे त्यामुळे थोडीसुद्धा घसरण आली तर प्रत्येक वरच्या स्तरावर SELLING बघायला मिळत आहे.

आजचे सेशन सुद्धा चढ उताराचे दिसले, जागतिक स्तरावर संमिश्र  पण सकारात्मक संकेत होते, तीच सुरवात भारतीय शेअर बाजारात  (Todays Stock Market ) बघायला मिळले परंतु बाजार बंद झला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 84 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 49746 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 55 अंकांनी वधारून 14873 ह्या पातळीवर बंद झाला मात्र  NIFTY BANK 208 अंकांनी घसरून 32782 ह्या पातळीवर बंद झाला.

सध्या सराफा बाजार बंद आहे , परंतु MCX मध्ये सोने आणि चांदीचे दार वाढत आहे, पुढे गुडीपडावा जवळ आला आहे त्यामुळे दर वधारत आहेत . जागतिक स्तरावरील बाजारात सोने खरेदी होत नसली तरी जर करोना रुग्ण वाढले व LOCKDOWN अजून जास्त दिवस वाढला तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदी कडे गुंतवणूकदार बघत असतात .

बाजारातील जाणकार सांगत आहेत की, MCX आणि शेअर बाजारात बाय ऑन डीप हे तंत्र अवलंबवावे.

(Todays Stock Market )

NIFTY १४८७३ + ५५
SENSEX ४९७४६ + ८४
BANK NIFTY ३२७८२ – २०८ 

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

JSW STEEL ६१६ + १०%

TATA STEEL ९२२ + ५%

SHREECEM ३१६८० + ५%

ULTRACEMCO ७०४० + ४%

HINDALCO ३६६ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

SUNPHARMA ६१४ – १%

INDUSINDBK ९३५ – १%

SBI LIFE ९०९ – १%

ONGC १०४ – १%

BAJFINANCE ५०२७ – १%

यु एस डी आय एन आर $ ७४.५८५०

सोने १० ग्रॅम         ४६४००.००

चांदी १ किलो       ६७२७०.००

क्रूड ऑईल           ४४३७.००

Vishwanatha-Bodade
Vishwanatha-Bodade

संपर्क – 8888280555