सर्वात वर

Todays Stock Market – मुंबई शेअरबाजार ५० हजाराच्या उंबरठ्यावर

विश्वनाथ बोदडे,नाशिक

आज (Todays Stock Market) सतत तेराव्या दिवशी NIFTY सकारात्मक बंद  करण्यात यशस्वी ठरला, पण तसे बघितले तर आजचे संपूर्ण सत्र जबरदस्त VOLATILE राहिले एक वेळ NIFTY 100 अंकांनी नकारात्मक झाला।होता परंतु दुपारच्या सत्रात बाजारांत IT आणि PSU BANKING क्षेत्रात चांगली खरेदी बघायला मिळली आणि त्याचाच परीणाम म्हणून आज तेराव्या दिवशी बाजार हलक्या स्वरूपात फ्लॅट बंद झाला. 

मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock Market)तीस समभागांचा निर्देशांक  SENSEX 24 अंकांनी नकारात्मक बंद होऊन 49492 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक निफ्टी 1 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 14565 ह्या पातळीवर बंद झाला तर NIFTY BANK मात्र खरेदीच्या जोरावर 235 अंकांनी वधारून आतापर्यंतच्या उंचीवर म्हणजे 32547 ह्या पातळीवर बंद झाला. 

आज (Todays Stock Market) बाजार बंद झाल्यानंतर INFOSYS आणि WIPRO यांचे निकाल घोषित होणार असल्यामुळे व चांगले निकाल अपेक्षित असल्याने मागील काही दिवसांपासून  IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मागणी दिसली आहे. त्याच बरोबर INFOSYS ने आपले निकाल बाजार बंद झाल्यावर निकाल अपेक्षेपेक्ष्या चांगले आल्याचे बाजाराचे जाणकार सांगत आहेत. 

आम्ही नेहमी अधोरेखित करत आहोत की, बाजार उंच स्तरावर आहे त्यामुळे बाजारात VOLATILITY मोठ्या प्रमाणात ह्या पुढे सुद्धा बघायला मिळेल त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करतांना बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबवावे.

NIFTY १४५६५ + १.४०

SENSEX  ४९४९२ – २४

BANK NIFTY ३२५७४ + २३५%

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

M& M ८२४ + ६%

SBIN ३०६ + ५%

ADNIPORTS ५३४ + ४%

IOC १०१ + ३%

NTPC १०२.५० + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

BAJFINANCE ४८९४ – ३%

SHREECEM २४६५० – ३%

HDFC २६७२ – ३%

UPL ४९१ – २%

BAJAFINSV ८७८५ – २%

यु एस डी  आई एन आर $ ७३.३०२५

सोने १० ग्रॅम         ४९३२०.००

चांदी १ किलो       ६५८००.००

क्रूड ऑईल            ३९१०.००

Mobile -8888280555