सर्वात वर

शेअर बाजारात आज नफा वसुली

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

आज भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market)  हा संपूर्ण दिवस हलक्या स्वरूपात चढ ,उताराचा परंतु नफा वसुली चा दिवस राहिला असे म्हणावे लागेल म्हणूनच मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX आज (Todays Stock Market)  फ्लॅट दोन अंकांनी नाकारात्मक बंद होऊन 51 935 या पातळीवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी आठ अंकांनी घसरून 15 575 या पातळीवर बंद झाला तर बँक निफ्टी 190 अंकांनी घसरून 35337 या पातळीवर बंद झाला.

डिसेंबर 2020 पासून सेबीने मार्जिन संबंधी लागू केलेल्या नियमांचा आज बाजारामध्ये तिसरा टप्पा सुरू झाला त्याचा सुद्धा बाजारात परिणाम दिसत होता, कारण आता जर गुंतवणूकदाराला खरेदी करायची असेल तर 75 टक्के मार्जिन द्यावी लागेल हेच नियम डिसेंबर 2020 ला जेव्हा लागू झाले तेव्हा पुढील तीन महिन्यासाठी 25% एवढे होते त्यानंतर 50 टक्के झाले आणि आज पासून 75 टक्के झाले तर सप्टेंबर 2021 पासून हे 100% मार्जिन लागणार आहे, याचा अर्थ असा होतो की यापुढे गुंतवणूकदारांना उधारीवर खरेदी करता येणार नाही त्यामुळे बाजारातील तज्ञ सांगत आहेत की काही प्रमाणात तरलता आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार यावर परिणाम दिसू शकतो या सर्व नियमांना ब्रोकर संघटना यांनी विरोध दर्शवला आहे तर मी असे सांगत आहे की हे नियम गुंतवणूकदारांच्या भल्यासाठी करत आहोत.

आजचा बाजार दिवसभर  (Todays Stock Market) स्थिर अवस्थेत होता परंतु काही क्षेत्रांच्या समभागांमध्ये खरेदी सुद्धा बघायला मिळाली यामध्ये एनबीएफसी बँकिंग या समभागांमध्ये खरेदी होती तर भेटन सिमेंट या क्षेत्रामध्ये नफा वसुली बघायला मिळाली.तसे आम्ही मागील लेखांमध्ये उल्लेख केला होता की सध्या बाजारामध्ये इंडेक्स मॅनेजमेंट सुरू असल्याचे दिसत आहे कारण वेगवेगळ्या दिवसाला ते वेगळ्या क्षेत्रातील सर्व भागांमध्ये खरेदी बघायला मिळत आहे त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आपला उंच स्तर गाठण्यात यशस्वी दिसत आहेत.कमोडिटी बाजाराचा विचार केला तर आज क्रूड ऑइल अजून एक नवा उच्चांक घातला आहे याचे परिणाम भविष्यात इंधनाच्या दरावर आपल्याला दिसू शकतात त्याच बरोबर सोने आणि चांदी यांचे दर सुद्धा वधारलेले आहेत.

NIFTY १५५७५ – ८

SENSEX ५१९३५ – २

BANK NIFTY ३५३३७ – १९० 

(Todays Stock Market) आज निफ्टी वधारलेला शेअर्स  

ADANIPORTS ७९९ + ४%

ONGC ११८ + ३%

BAJFINANCE ५७७५ + ३%

SBIN ४३३ + २%

HDFC २५८० + १%

(Todays Stock Market)आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

JSW STEEL ६९५ – २%

TATA STEEL ११०१ – २%

ICICI BANK ६५‍‍१ – २%

ASIANPAINT २९२५ – २%

ULTRACEMCO ६६०५ – २%

यु एस डी  आय  एन आर $ ७३.१६००

सोने १० ग्रॅम          ४९१३४.००

चांदी १ किलो        ७२९२०.००

क्रूड ऑईल            ४९८५.००

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

  संपर्क- 88882805555