सर्वात वर

शेअरबाजार ३९५ अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे,नाशिक

मागील काही दिवसांच्या संथ कारभारा नंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये संमिश्र संकेत असली तरी भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) मध्ये मात्र जोरदार तेजी त्याच बरोबर काही प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 395 अंकांनी वधारून 52880 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 112 अंकांनी वधारून 15834 या पातळीवर बंद झाला, त्याच बरोबर 12 बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक आजच्या बाजाराचा हिरो ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण हा निर्देशांक तब्बल 402 अंकांनी वधारून 35212 या पातळीवर बंद झाला.

आजच्या बाजाराचे (Todays Stock Market) वैशिष्ट्य म्हणजे मीट कॅप स्मॉल्कॅप त्याच बरोबर बँकिंग फायनान्स मेटल या क्षेत्रांच्या समभागांमध्ये चांगल्या प्रकारे मागणी दिसली त्याच बरोबर कारोनामुळे मागील काही दिवसांमध्ये ज्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसली होती त्यामध्ये प्रामुख्याने हॉटेल टुरिझम विमान सेवा औद्योगिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या या समभागांमध्ये सुद्धा आज मागणी दिसली.

बाजारामध्ये आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा असून यामध्ये फ्युचर हे एक सेगमेंट आहे यामध्ये निफ्टी फीचर ने सर्वात जास्त उच्चांक इंट्राडे ट्रेडिंग मध्ये 16 516 इतका नोंदविला तर स्पॉट निफ्टी मात्र पंधरा हजार आठशे 40 च्या दरम्यान होती याचाच अर्थ असा होतो की बाजारामध्ये पुढील काळात तेजी येऊ शकते का असे बाजारातील जाणकार आपले मत व्यक्त करत आहेत.

डॉलरच्या मुकाबल्यात आज रुपया मजबूत होता तर कमोडिटी बाजारामध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदी मध्ये हळुवारपणे वरच्या स्तरावरून विक्री येत आहे त्यामुळे यामध्ये घसरण आपण बघत आहोत तर दुसरीकडे मेटल व क्रूड ऑइल यामध्ये चांगली मागणी दिसत आहे क्रुड ऑईल चे भाव मागील काही दिवसांमध्ये दररोज वाढताना दिसत आहे त्याचा परिणाम आपल्याला धनाची दरवाढ होताना दिसत आहे त्याचाच परिणाम महागाई वाढीवर सुद्धा होत असतो,

बाजारातील जाणकार सांगत आहेत की बाजार जरी संत अथवा गतीने वाढला तरीसुद्धा गुंतवणूकदारांनी बाय या तंत्राचा वापर करावा आणि आपली गुंतवणूक चांगल्या क्षेत्रांच्या समभागांमध्ये करत राहावी.

(Todays Stock Market)

NIFTY १५८३४ + ११२

SENSEX ५२८८० + ३९५

BANK NIFTY ३५२१२ + ४०२  

(Todays Stock Market) आज निफ्टी वधारलेला शेअर्स  

HINDALCO ३९० + ४%

ONGC १२१ + २%

SBIN ४३४ + २%

TATA STEEL ११५८ + २%

COAL INDIA १५१ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TECHM १०७२ – २%

HDFC LIFE ६७८ – २%

BPCL ४६० – १%  

DR.REDDY ५५४१ – १%

HCLTECH ९८० – १%

यु एस डी  आय एन आर $ ७४.४६२५

सोने १० ग्रॅम         ४७२८२.००

चांदी १ किलो         ७०१२०.००

क्रूड ऑईल            ५६१८.००

विश्वनाथ बोदडे,नाशिक

संपर्क- 8888280555