सर्वात वर

Todays Stock Market : सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केट मध्ये तेजी


विश्वनाथ बोदडे,नाशिक

आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे सकाळी भारतीय शेअर बाजार हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडले , परंतु बाजारात आज काही प्रमाणात मेटल, फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये विक्री बघायला मिळाली परंतु आज बाजारात खऱ्या अर्थाने हिरो ठरले ते PSU BANKING क्षेत्र

आज PSU INDEX 7% ने वधारला त्याच बरोबरच बाजाराला सकारात्मक बंद करण्यात आय टी आणि RELIANCE ने सुद्धा मदत केली याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 181 अंकांनी वधारून 45608 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा  निर्देशांक NIFTY सुद्धा 37 अंकांनी वधारून 13393 ह्या पातळीवर बंद झाला तर NIFTY BANK दिवसभर VOLATILE। राहिला आणि 50 अंकांनी वधारून 30262 ह्या पातळीवर स्थिरावला.

बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1344 समभाग सकारात्मक होते तर 1374 समभाग नकारात्मक दिसले आणि 130 समभागांमध्ये कोणताही बदल दिसला नाही. आजच्या सत्रात बाजारात PSU -PUBLIC।SECTOR BANKING मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिसली यात आघाडीवर होते CANARA BANK,  BANK OF BARODA, PNB, CENTRAL BANK, BANK OF INDIA, BANK OF MAHARASHTRA.

मागील ६ दिवसांपासून बाजारात तेजी दिसत आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रांच्या शेअरमध्ये मागणी दिसत आहे.बाजाराला आता पर्यंत वरच्या पातळीवर नेण्यासाठी   FII चा मोठा हात राहिला आहे, एकीकडे स्थानिक वित्तीय संस्था (DII) नफा वसुली करत आहेत तर विदेशी वित्तीय संस्था (FII) दररोज खरेदी करत आहे. बाजारातील सूत्र सांगत आहेत की ,अशा वेळी सामन्य गुंतवणूकदराने सावध पवित्रा ठेवला पाहिजे 

NIFTY १३३९३ + ३७

SENSEX  ४५६०८ + १८१ 

BANK NIFTY ३०२६२ + ५०%

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

ULTRA CEMCO ५२११ + ३% 
T C S २७९५ + २% 
RELIANCE १९९२ + २%
WIPRO ३६४ + २% 
HCL TECH ८६३ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HINDALCO २४५ – ३%
SUNPHARMA ५६९ – २%
COAL INDIA १३४ – २%
INDUSINBK ९१८ – २%
N T P C ९८ – २%

यु एस डी  आई एन आर $ ७३.७३५०


सोने १० ग्रॅम         ४९७९०.००


चांदी १ किलो       ६४८००.००


क्रूड ऑईल            ३३५५.००

Vishwanath Bodade

विश्वनाथ बोदडे,नाशिक


Mobile-8888280555