सर्वात वर

शेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स पुन्हा ५० हजार पार

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेत यांच्या आधारे सिंगापुर निफ्टी सकाळी 170 अंकांनी होते, त्याचेच पडसाद सकाळी (Todays Stock Market)भारतीय शेअर बाजारात बघायला मिळाले. सकाळी SENSEX जवळपास 400 अंकांनी सकारात्मक होता फक्त काही वेळ चढ-उतार बाजारात दिसले परंतु त्यानंतर बाजारात विविध क्षेत्रांमध्ये मागणी बघायला मिळाली.

आजच्या सत्रात निफ्टी जवळपास 200 अंकांनी वधारले होते परंतु बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर (Todays Stock Market) बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 612 अंकांनी वधारून 50193 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 185 अंकांनी वधारून 15108 ह्या पातळीवर स्थिरावला तर बारा बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी 463 अंकांनी वधारून ते  33922 या पातळीवर बंद झाला.

बाजारात येऊ घातलेले कंपन्यांचे तिमाही निकाल , करोणाची घसरती रुग्णसंख्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) आपल्याला दिसत आहे.काल बाजाराला बँकिंग क्षेत्राने सांभाळले तर आज बाजारात संमिश्र विविध क्षेत्रांमध्ये मागणी बघायला मिळाली, सध्या बाजारात रिटेल गुंतवणूकदार यांची संख्या चांगल्या प्रकारे वधारली आहे त्याचाच परिणाम म्हणून NSE मध्ये होत असलेल्या टोटल टर्नओव्हरचा तब्बल 45 टक्के सौदे हे रिटेल गुंतवणूकदारांकडून होताना दिसत आहे.सध्या बाजारात गुंतवणूकदार सद्यःस्थितीचा विचार करता हे एकीकडे बहुतेक राज्यांमध्ये लोक डाउन ची परिस्थिती आहे आणि करोना आटोक्यात येईल की नाही यात शंका त्यांच्या मनात आहे त्यामुळे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक डिलेव्हरीआणि ऑप्शन च्या माध्यमातून नोंदवताना दिसत आहे.

बाजारातील गुंतवणूक तज्ञ असे सांगत आहे की, बाजारामध्ये सध्या गुंतवणुकीचे सकारात्मक वातावरण दिसत नसले तरी ज्या गुंतवणूकदारांना लांब वधीसाठी गुंतवणूक करायची असेल त्या गुंतवणूकदारांनी बाजारातील चांगल्या नफा देणाऱ्या क्षेत्रांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक ही टप्प्याटप्प्याने केलीच पाहिजे.

NIFTY १५१०८ + १८५

SENSEX ५०१९३ + ६१२

BANK NIFTY ३३९२२ + ४६३ 

आज निफ्टी वधारलेला शेअर्स (Todays Stock Market)

M&M ७९७ + ६%

BAJAJ AUTO ४०६५ + ५%

TITAN ‍१५४१ + ५%

BAJFINANCE ५६७६ + ५%

ADANIPORTS ७८० + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव (Todays Stock Market)

BHARTIARTL ५३७ – ३%

ITC २१० – १%

COAL INDIA १४७ – १%

DR.REDDY ५२१८ – १%

DIVS LAB ४०३० – १%

यु एस डी आय एन आर $ ७३.१८००

सोने १० ग्रॅम         ४८४३७.००

चांदी १ किलो        ७३९६०.००

क्रूड ऑईल            ४८६५.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक 

 संपर्क – 8888280555